संतुष्ट केलें ||५८॥ तयांचे एक प्रेमळ भक्त । अंबुराव
नामें विरक्त | तेथे येवून स्वस्थ | साधन करीत राहती
।। ५९ ॥ सदा हिंडती भुमिवरी | सप्त्यास येती
हिंचगेरी | भजन लाविती परोपरी | नाना यत्ने ।। ६० ।।
नीच जाती अथवा संस्थानिक यांनी पाचारिले
असतां देख । त्यांचा भाव पाहोनि नेमक | गृहा जाती
।। ६१ ।। परमार्थी नाहीं लहान थोर । विद्या धन वर्ण
विचार | परी प्रपंची वागती साचार । ज्याचे त्यापरी
।। ६२ ।। प्रपंची जाणती पृथक्करण | परमार्थी जाणती
एकीकरण । अंत्यज गुरुबंधूसही लोटांगण | प्रेमें
घालती ॥ ६३ ॥ बाष्कळांस घालिती नमस्कार | वादास
न देती थार । नेमकांस सांगती बहुतर । अनुभव आपुला
।। ६४ ।। अथवा जो कां अनन्यशरण । तयांसही अनुभव
सांगती जाण । अनुभवापुढें शब्दज्ञान । फिकें पाडती
।। ६५ ।। ओझे कदापि न घालिती | शिष्यांसि स्वल्पही
न मागती । बहुरूपी बहुरंगी मायेप्रति । ठाव नसे ।। ६६ ।।
पान:नित्यनेमावली.pdf/१३३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९७