Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ क्षणभरी । त्या प्रेमदुःखाची सरी । कोठेंचि नसे ॥ ५० ॥

असो, नंतर

। परमार्थ पाहिजे विचार केला कीं साधिती वाढविला । म्हणोनि साधिती साधनाला । अहर्निशीं । ।। ५१ ।। गुरुकृपेनें भाग्य फळलें पूर्ण अद्वैत मनीं त्रिवलें । तेणें समूळ उडोनि गेलें । मायाजाळ ।। ५२ ।। मनीं उदात्त हेतू धरती । कीं गुरुंची व्हावी कीर्ती । देवालय बांधून भूर्ति आंत स्थापावी || ५३ ।। आणि विठोबास नवस केला | भक्तिमार्ग पाहिजें वाढला | मग पंढरीस येऊन तुम्हांला । लोटांगण घालीन ॥ ५४ ।। सद्गुरूची पूर्ण कृपा होतां । मग करावी नलगे चिंता । विश्वास साधन गुरुकृपा मिळतां । काय उणें ।। ५५ ।। ऐसा मिळवोनि अनुभव । मग वाढविती समुदाव । कर्नाटक घुंडोनि सर्व । भक्तिमार्ग वाढविती ।। ५६ ।। लोक उद्धराया अवतरले । भक्तिमार्गासि लाविले । भूमंडळी ख्याती पावले हे | समर्थ ॥ ५७ || गांवोगांवी जाऊन भजन साधन करुन । नानाप्रकारे जन । "7 V .