पान:नित्यनेमावली.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोण याचा निर्धार | केवि कळे ।। ३४ ॥ वर्णाचा गुरु । ब्राह्मण । ऐसें असें वचन | हें सर्वथा सत्य जाण । परी ब्राह्मण कोणा म्हणावें ॥ ३५॥ ब्रम्ह जानाति ब्राह्मण | जो ब्रह्मविद असे जाण । जो मात्मज्ञान जाणे पूर्ण | तयासीच ब्राह्मण म्हणावें ॥ ३५ ॥ एवं तुकाराम ब्राह्मण आणि चोखामेळाही ब्राह्मण | ब्राह्मण नसतां ब्राह्मणंमन्य | गर्दभ जाणावे ॥ ३७॥ असो ऐसी निंदा होतां । ज्याचें धैर्य न चळे सर्वथा । तोचि जाणावा तत्त्वतां | देवपुरुष ॥ ३८ ॥ इकडे साधन चालिलें | इकडे वैराग्य अंगीं भरलें । तेणें सामर्थ्य आलें । उदंड अंगीं ॥ ३९ ॥ एकदां गुरुसन्निध असतां आणि साधन । चाललें असतां | भोंगा मांडी पोखरी तत्त्वतां | परी अणुमात्र ढळेना |॥ ४० ॥रांनीं वनीं सर्प वृश्चिक | सन्निध येती जाती देख अथवा अंगावरी चढती । निःशंक | परी भीति असेना ॥ ४१ ॥ अथवा पाऊसें- भिजविलें | किंवा आतपें पोळलें | किंवा शीतें शरीय ।