पान:नित्यनेमावली.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ बोलती । उगाच कालक्षेप करविती 1. व्यवसायभरे ।। २६ ।। तेणें झाला उदंड त्रास । भाऊराव चुकविती जनांस | जाऊं लागती वनास | साधन करावया ॥ २७ ।। मध्यान्हीं पोथी वाचती । श्रवणमननी निमग्न होती । नेमस्तपणें चुकविती । जनत्रास अवचा || २८ || रात्रीं जनांसी भेट देती । शिघ्रचि कामे आटोपती प्रपंची मलित न करिती | परमार्थबुद्धि ॥ २९ ॥ वाढत चालला अनुभव । विवेकवैराग्या मिळे ठाव । वैराग्यभरें प्रपच वाव | होऊ लागे । ३०॥ उदंड वैराग्य उपजलें । मामलतीसी नाकारिलें 1. | परमार्थ उत्तम म्हणोनि राहिलें । स्वतंत्र रीतीं ॥ ३१ ॥ जन बहुत निंदा करिती । यांचा लिगायत गुरु म्हणती । कोणी म्हणती चेटक निश्चिती | गुरूनें केलें ॥ ३२ ॥ श्वशुराचा होतसे त्रास | संबंधो धरिती अविश्वास | सर्व ढोंग म्हणूनि त्यांस | बहुन पीडा करिती ॥ ३३ ॥ परी अज्ञांसि न कळे ॥ विचार । नाहीं आत्मशानाचा साक्षात्कार | ब्राह्मण ●