Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९२

साचार | अंतर वेधिती सत्वर । भक्तिमार्गी ओढिती
॥ १८ ॥ निंबरगी गुरूंस शरण | जावया उपदेशिती जाण ।
त्यांस निंबरगीस घेऊन । स्वयेंच जाती ॥ १९ ॥
निंबरगीमहाराज अति थोर | धीर उदार आणि
गंभीर । दूरदृष्टीने करोनि विचार | साधुबुवास आज्ञापिती
॥ २०॥ आज्ञा करिती साधुकारण । तुम्हीच
अनुग्रह करावा म्हणून | साधुबुवांनी मान्य करून |
भाऊराव उपदेशिले ॥ २१॥ अनुग्रह घेवोनि सत्वरी ।
राहिले उमदीभीतरीं । त्रिकाल साधन निर्धारी । करीत
राहती ॥ २२ ॥ प्रपंच परमार्थ दोन्ही । चालविती
नेमेंकरुनी । परमार्थचि स्वार्थ मानुनी | साधन
वाढविती ॥ २३ ॥ कुलव्यवसाय करिती । लोकांचीं
मनें सांभाळिती । म्हणून जडली प्रीति | मर्यादेवेगळी
॥ २४ ॥ लोकांवरी करिती उपकार । उपकारची होऊ
पाहे अपकार | जनसमूहाचा त्रास फार | होऊं लागे
॥ २५ ॥ प्रापंचिक लोक येती । प्रापंचिकचि गोष्टी