पान:नित्यनेमावली.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. ९१ निराकार || १० || 'व' म्हणिजे इहलोकींचे देव । साकारासारिखे अवयव । परंतु निराकार हाचि भाव | व्यक्त होई ।। ११ । जन्म झाला देशपांडें कुळीं । जें कां विधीने लिहिलें भाळीं । पुढें गुरूप्रसादे तात्काळीं । ललाटरेषा पुसली ॥ १२ ॥ उगवलें अनंत जन्मींचें प्रारब्ध स्वरूप लाधलें स्वतःसिद्ध स्वरूपदर्शन होतां बद्ध- । वार्तांचि उडाली ॥ १३॥ असो हे सर्व पुढे झालें । परी वालपणीं काय वर्तलें । आणि साधन कैसे केलें । तेंचि आतां निरूपिजेल ॥ १४ ॥ यांचे वडील बंधू दोघेजण | नानासाहेब आणि दाजीबा जाण । रघुनाथप्रियांनी कृपा करून । अनुगृहीत केले ।। १५ ।। वालपणीं भाऊराव । निर्गुणज्ञान मानिती वाव दाजिबांची गुरुसेवा सर्व । लटकी मानिती ।। १६ ।। परी । करिती सगुण उपासना । मारुति नित्य पूजिती जाणा । तेथें भेटती रघुनाथप्रियांना नित्यनेमें करूनि ।। १७ ।। त्यांस रघुनाथप्रिय नमस्कार # स्वयेंचि घालोनी ..

.