पान:नित्यनेमावली.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ तत्वतां । महासमर्थे । ४१ ।। तया समर्थाचे कथन | पुढील समासी करीन | तुम्ही श्रोते विचक्षण | होऊनि ऐका ॥ ४२ ॥ समर्थाचे चरित्र कथन । गहनाहूनि अति गहन | म्या अबुद्धे तें लिहून | किचिन्मात्र ठेविलें ।। ४३ ।। त्यांत काय शुद्ध काय अशुद्ध । मज कळेंना । शुद्धाशुद्ध | मी आहे परम बुद्ध | सर्वामध्यें ॥ ४४ ॥ बोलतां नये तें कथिलें । सांगतां नये तें सांगितलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥ अगाध समर्थ महिमान | केंवी वर्णू शके अज्ञान | परि समास केला पूर्ण । म्या मतिमंदे ॥ ४६॥ इति श्री गुरूपरंपरा- निरुपण नाम प्रथमः समासः || 4 1. श्री गणेशाय नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥ नमः || श्रीराम समर्थ ॥ तुझा महीमा गातां श्रीपती | श्रुतिशास्त्राची कुंठीत मती | पार न कळे मग निश्चितीं । नेति नेति बोलती ।। १ ।। नाहीं रूप नाही नांव । त्रिगुणरहित