Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८८

नाम पावले तत्वाता | मग समर्थे दिधली सत्ता ।
उपदेशावया || ३३ || तंव अनेक जन उपदेशून |
भक्तिमार्गातें लावून | साधनसिद्धीस पाववून | मोक्षा
नेले || ३४ || भजन गायन नाना उपाय | करोनि
स्मरती समर्थपाय | तयांसी नाम रघुनाथप्रिय । प्राप्त
झालें || ३५ || उमदीकर देशपांडे एक | सोळा वर्षाचे
बालक | तेही झाले सेवक समर्थांचे || ३६ || लहान
असुनी सात्विक | संभावीत आणि तपक | एकनिष्ठ
आणि भाविक | देव- अंश || ३७ || तयांचे अंगीं
वैराग्य बाणलें | सुदृढ धरिती गुरुंची पाउले | साधन
साधीत चालले | एकनिष्ठपणें || ३८|| प्रतिगुरुवारीं
येऊन गुरुच्या चरणीं होती लीन | भेटीवीण न करिती
भोजन | प्राणांतींही || ३९ || ऐशीं वर्षे बेचाळीस |
न चुके साधन एक दिवस | अंतरी वसे उल्हास
भक्तिविषयी || ४० || प्रसंग अथवा अडचण येतां |
किंवा आनंदी मन असतां न चुकविले साधन