जाहले || २४ || समजून घेतला गुह्यार्थ | राहती बहुधा
अरण्यांत | रामदासापरी समस्त | वेळ क्रमिती || २५ ||
प्रपंच परमार्थ मिळोन | दोन्ही चालविती समान |
छत्तीस वर्ष करुनि साधन | सिद्ध जाहले || २३ || मग
लोक उपदेशिले | भक्तिमार्गा लाविले | शतानुशत
उद्धारिले | तया ग्रामीं || २७ || तंव एक ब्रह्मचारी |
काशी करुनि पंढरपुरी | जाता राहिले सोनगी नगरीं |
निंबरगीसन्निध || २८ || ब्रह्मचारी आले ऐकुन |
लोंटांगणें जाती जन | समर्थही भेटीकारण । तेथें
आले || २९ || निर्गुण भक्त समर्थ जरी | सगुण
भक्त ब्रह्मचारी | दोघां वाद बहुतांपरी। थोडा वेळ
जाहला ||३०|| समर्थगुह्य ठसून मनीं | ब्रह्मचारी
लागले चरणीं | उद्धारा मातें ह्मणोनि | दुःखी
जाहले || ३१ || मग समर्थे उपदेशिलें । तेधवां मन
तल्लीन झालें | उमदी ग्रामीं राहिले । साधन
करुनि || ३२ || द्वादश वर्षे साधन करितां | साधु
पान:नित्यनेमावली.pdf/१२३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८७