Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ त्यांचा अनुग्रह झाला परम । तोचि कथाभाग सुगम | आधी सांगिजेल || १६ || निंबरगी नामें एक ग्रामीं | नारायणराव गुरूस्वामी । तयांचे चरित्र वर्णितों मीं । अल्पमात्र ।। १७ ।। महाराज असता लहान । सण पातला फाल्गुन | समर्थ बहुत वेळ खेळून | गृही आले ।। १८ ।। ह्मणोनि वडील बोलिले । रागें समर्थ निघाले | पंढरपुरीं त्वरित पातले | | विठ्ठलदर्शना ।।१९।। ||१९|| जैसे दास गेले वनीं । तैसे समर्थ विठ्ठलभवनीं । देउळामाजीं बैसले ध्यानीं एकाग्रमनें ।। २० ।। ऐसें सप्त दिवस ऋमित । तंव स्वप्न झालें अवचित । सिद्ध- गिरीस जावें त्वरित | आज्ञा जाहली ||२१|| मग तें सिद्धगिरीस जात । तंव पुराण चाललें क्षेत्रांत । तें ऐकती देऊनि चित्त । हर्षनिर्भर होऊन ॥ २२ ॥ जंगम - रूपें काडसिद्ध । खुणें संबोधिती सन्निध जाताचि | समर्थ सुबुद्ध | उपदेशिले ॥ २३ ॥ तेणें जाहले तल्लीन । मग गुर्वाज्ञा घेऊन । निवरगी ग्रामी परतोन । ये ते