हे पान प्रमाणित केलेले आहे.
८४
सप्तसमासी
❁❁❁❁
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो
नमः । श्रीराम समर्थ ॥ आधीं प्रार्थू गजानना ।
सकळ विद्येचिया प्रधाना | विद्या कला उठती नाना |
जयापासुनी ||१|| तो मंगळमूर्ती सकळांसी । आदि
मध्य अवसानासी । सांभाळतो अहर्निशी । निरंतर
||२|| आतां स्तवूं वेदजनानी | सकळ विद्या जियेचेनी
पावती ज्ञानाज्ञान प्राणी । कर्मानुसार ॥३|| भावें
विनवूं श्रोतयांसी । जे कां अधिकारी श्रवणासी ।
जाणती श्रवणवर्मासी । अनुभवानुरूप ॥ ४ ॥ साष्टांग
नमन सद्गुरूसी । प्रेमभावें वंदी चरणांसी । जो पार
उतरी भवासी । क्षणमात्रें ॥ ५॥ जयजयाजी
सद्गुरुनाथा | तुझिया पदीं माझा माथा । कृपा करिजे
अनाथनाथा | मज दीनावरी ॥ ६ ॥ जयजयाजी रेवण-
सिद्धा | सिद्धामाजीं महासिद्धा | बुद्धि देईजें मज