पान:नित्यनेमावली.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ पद ४ थें हेंचि दान देई स्वामी । राहो मन नित्य नामीं ॥१॥ तुझी सेवा अखंडीत | घडो, रूपीं जडो चित्त ॥ २॥ अहर्निशीं संतसंग | घडो मज हा प्रसंग ॥ ३॥ दुरितकानन दहन करा | पुण्यरूप वैश्वानरा ॥४॥ शिरों ठेऊनीया हात। दासा करिसी जीवन्मुक्त ॥५॥ तूंचि माता पिता । तूंचि माझी भगिनी भ्राता ॥ तूजविणें चित्ता | नावडेची दुसरें ॥ ६ ॥ तूंचि माझें कुलदैवत । तूंचि माझी गणगोत । तूंचि माझें वित्त । नावडेचि दुसरें ||७|| तूंचि माझें प्रेमसुख | तूंचि माझें निरसी दुःख । तूजवीणें देख । नावडेचि दुसरें ||८|| तूंचि दासाचा सारथी | तूंचि माझी भागीरथी | तुजविणें गुरुमूर्ति | नावडेचि दुसरें ॥९॥ पद ५ वे माता फार काय बोलूं तुम्हांपुढें । पुरे कर्मझाडे भोगणें ते ॥