हे पान प्रमाणित केलेले आहे.
७७
त्रिभुवनीं तूचि थोर | दीनजन उद्धरिता ॥१॥
सद्बुद्धि दे मजला । दुर्बुद्धिचा वीट आला |
कामादि वैरि वारी । करि निष्काम मजला ॥२॥
वासना मनिं वसली । कधीं निघेनासी जाहली
कोठवरी तिसि भांडू। मति माझी थकली ॥३॥
मोहमाया ममता भारी। गांजिताति परोपरी ।
यांतूनि सोडवि बा । तूंचि माझा कैवारी ॥४॥
निद्रा ही रांड खोटी । नित्य लागलीसे पाठीं
आयुष्य व्यर्थ गेलें । पाहू नेदि जगजेठी ॥५॥
देहभाव बहु खोटा | मज करुनि करंटा |
देशोघडि लावियले । अन्न न मिळे पोटा ॥६॥
ऐसे हे अनंत गुण । गांजिताति कठीण
यांतूनि कोण मजला | सोडविल बा तूजविण ॥७॥
प्रार्थना परिसावी । गुरुराया गोसावी ॥
दुर्गुण वारुनिया | द्यावी सायुज्यपदवी ॥८॥
दासासि संरक्षा । कामधेनु कल्पवृक्षा |
आपुले ब्रीद रक्षा | पुरवी माझी अपेक्षा ॥९॥