पान:नित्यनेमावली.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
७०

जालों । तुझा दास० ।। ७ ।। सदा सर्वदा राम सोडूनि कामीं । समग्र तुझें दास आम्हीं निकामी बहु स्वार्थबुद्धीने रे कष्टवीलो | तुझा दास ॥ ८ ॥ जयजय रघुवीर समर्थ | पाळणे. निजसुख पाळणा पाळणा, हालविते मी कृष्णा, क्षणभरि करि शयना, करि शयना, लागो दे तुज नयना || रु | चंदन काष्ठाचा, काष्ठाचा, रंगित भवरंगाचा । जडीत रत्नांचा, रत्नांचा, वर चेंडू मोत्याचा ॥१॥ कळस सोन्याचा, सोन्याचा, चौकोनी रुप्याचा || साखळदंडाचा, दंडाचा, मंजुळ शद्व- सुखाचा ॥२॥ दोरी निजहातीं, निजहातीं, तुजला गाती गीतीं । सखया हालविती, हालविती, घे बाळा विश्रांति || ३ || ऐशा ब्रजवाळा, व्रजवाळा, हालविती' गोपाळा | त्रिवक प्रभुलीला प्रभुलीला, वर्णित वेळो- वेळां ॥४॥ . -