Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६८

रघूनायका काय कैसे करावे ॥१॥ जनीं बोलता
बोलतां वीट वाटे । नसे अंतरी सूख कोठें न कंठे |
घडीने घडी चित्त कीती धरावें | रघूनायका० ॥२॥ बहु
पाहतां अंतरी कोंड होतो । शरीरास तो हेत सोडोनि
जातो | उपाधीस देखोनि वाटें सरावें | रघूनायका ०
॥३॥ अवस्था मनीं होय नाना परीची | किती काय
सांगू गती अंतरींची | विवेकेंचि या मानसा आवरावें ।
रघूनायका० ॥४॥ म्हणे दास ऊदास झालों दयाळा ।
जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा | तुझा मी तुला
पूसतों सर्व भावें । रघुनायका० ॥५॥

(२)

 तुझा भाट मी वर्णितों रामराया। सदा सर्वेदा गाय
ब्रीदें सवाया । महाराज दे अंगिचें वस्त्र आतां । बहू जीर्ण
झाली देहबुद्धि कथा ॥ १ ॥ रामदूत वायु-सुत भीम-
गर्भ जुत्पती । जो नरांत वानरांत भक्तिप्रेम व्युत्पती ।
दासदक्ष स्वामिपक्ष निजकाजसारथी | वीरजोर
शीरजोर धक्क धिंग मारुती ॥२॥