पान:नित्यनेमावली.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ कारुण्यसिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षे सांभाळि दीना | तुज० ॥५॥ विषयी जनानें मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें । समयीं बहु क्रोध शांती घडेना | तुज० ||६|| सुदृढ झाली देहबुद्धी देहीं । वैराग्य कांहीं होणार नाहीं । अपूर्ण कामीं मन हें विटेना । तुज० ||७|| निरुपणीं हे सद्वृत्ति होते ।स्थलत्याग होतां सवेंचि जाते काय करूं रे क्रिया घडेना । तुज० ||८|| जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा सिंधुहारी मज तारि हेळा भव- स्वामीवियोगें पळही गमेना | तुज० ||९|| आम्हां अनाथा तूं एक दाता । संसारचिंता चुकवी समर्था । दासा मनी आठव वीसरेना | तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ शनिवार उदासीन हा काळ जातो गमेना चिंता शमेना | उठे मानसीं C । सदा सर्वदा थोर सर्व सोडून जावें ।