हे पान प्रमाणित केलेले आहे.
६६
मुक्त केला । कृपेनें तसें स्वामि पाळी आम्हांसी ।
नमस्कार हा ० ||७|| सती अनुसूया सुधी आधीमाता ।
त्रयी मूर्ति ध्यानीं मनीं नित्य गातां । हरे रोग पीडा
दरिद्रासि नाशी | नमस्कार हा० ॥ ८ ॥ करोंनी मनीं
निश्चयो अष्टकाचा । कराहो जनीं पाठ दत्तात्रयाचा |
करी माधवाच्या सुता दास दासीं । नमस्कार
हा० ॥ ९॥
शुक्रवार
तुझिया वियोगें जीवत्व आलें । शरीरयोगें बहु
दुःख झालें । अज्ञान दारिद्र माझें सरेना | तुजवीण
रामा मज कंठवेना ||१|| परतंत्र जीणें कंठू किती रे |
उदास माझ्या मनि वाटतें रे | लल्लाटरेखा तरि
पालटेना | तुज० ॥ २ ॥ जडली उपाधी अभिमान
साधी। विवेक नाहीं बहुसाल बाधी । तुझिया वियोगें
पळही गमेना | तुज० ||३|| विश्रांति नाहीं अभिमान
देहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं । स्वहीत माझें
होतां दिसेना | तुज० ||४|| संसारसंगें बहु पीडलों रे ।