हे पान प्रमाणित केलेले आहे.
६५
गुरुवार
सदा प्रार्थितों श्रीगुरुच्या पदांसी । धरीतों शिरीं
वंदितों आदरेसी । धरूनी करीं तारि या बालकासी ।
नमस्कार हा स्वामि दत्तात्रेयासी ॥ १ ॥ मतीहीन मी
दीन आहे खरा हो । परी मी तुझा दास, कृपा कराहो ।
जसें लेकरूं पाळिते माय कूशीं । नमस्कार हा० ॥ २ ॥
लडीवाळ मी बाळ अज्ञान तूझा । गुरूवांचुनी पांग
फेडील माझा | तुझ्यावीण दूजा कोण आहे आम्हांसी ।
नमस्कार हा० ॥ ३ ॥ पिता माय बंधू सखा तूंचि
देवा । मुलें मित्र सारे सोयरे व्यर्थ हेवा । कळोनि
असे भ्रांति होई आम्हांसी | नमस्कार हा० ॥ ४ ॥
चरित्रें गुरूचीं करी नित्य पाठ । जया भक्ति लागे
पदीं एकनिष्ठ | तयाचे कुळीं दीप सज्ञानराशी ।
नमस्कार हा० ॥ ५ ॥ वसे उंबरासन्निध सर्वकाळ ।
जनीं काननीं घालवी नित्यकाळ तया सद्गुरूचें
नाम कल्याणराशी । नमस्कार हा० ।। ६ ।। श्रमोनी
गुरूपाशिं तो म्लेंछ आला । तथा स्फोटरोगांतुनी