पान:निखळलेलं मोरपीस.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तथापि मला स्वत:ला ज्या प्रकारचे कथा-लेखन करायला आवडेल अशी एकच कथा या संग्रहात आहे. पुस्तकाचे शीर्षक असणारे 'निखळलेलं मोरपीस' ही कथा. मद्रासला आमच्या ऑफिसच्या ट्रेनिंग सेंटरच्या आणि मरीना बीचच्या रम्य परिसरात बऱ्यापैकी चिंतन करुन लिहिलेली ही कथा मला स्वतः ला आनंद देणारी आहे. अनेक प्रकारच्या कौटुंबिक ताणतणावातून मोकळीक मिळाली तर अशा स्वरुपाच्या कथा लिहायला मला आवडेल.

 अशी एकूण माझ्या कथांची ही एक लघुत्तम कथा !

 हा कथासंग्रह देखण्या स्वरुपात आणि नेमक्या वेळेत प्रकाशित केल्याबद्दल 'प्रियांजली प्रकाशन' चे श्री. पराग लोणकर यांचा मी अत्यंत ऋणी आहे.


अविनाश टिळक

१/८, राजवाडा,

सांगली - ४१६४१६.

 निखळलेलं मोरपीस / ६