Jump to content

पान:निखळलेलं मोरपीस.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोणीतरी बिल्डिंगच्या पिछाडीला 'तयारीला लागलेल्या वशाला हे सांगितले. एक कोकणी शिवी हासडून वशा म्हणाला.

 "च्यायला, सगळी तयारी फुकट गेली."एवढ्यात जोशीबुवांच्या घरातून अचानक आरडाओरड आणि रडारड ऐकू आली. सगळीजण तिकडे धावले. जोशीबुवांना जबरदस्त हार्टअॅटॅक आला होता. डॉक्टरांना बोलवायला पण वेळ मिळाला नाही. बाथरूममध्ये हात धुवायला म्हणून गेले. तेथेच कोसळले. दोन मिनिटांत खेळ खलास!

 वशाची 'तयारी' फुकट गेली नाही! 'आयता' जोशी मिळाला.

 आपल्याच कथेचा जोशीबुवांनी केलेला शेवट क्रूर होता. मस्करीची कुस्करी करणारा होता. मी अस्वस्थ झालो होतो. डोळ्यात पाणी तरळत होते.

आयता जोशी / ६६