पान:निखळलेलं मोरपीस.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलीस. आता तुझा निश्चय बाजूला ठेवून तुझ्या खऱ्या आईला आनंदी कर. तुला 'कन्यादान' करून आम्हाला सुखाने कन्याकुमारीला विवेकानंदपूरममध्ये उर्वरीत आयुष्य घालवायला बरं. तुझा दृढनिश्चय आम्हाला माहीत असूनहि आम्ही तुला हा लग्नाचा आग्रह करीत आहोत म्हणजे आजवर मनोहरवर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन केल्याचे समाधान मिळेल. आम्हाला निराश करू नको. मुलगा गेलाच. निदान कन्यादानाचा तरी आनंद मिळू दे. तुझ्या लाडक्या मनोहरसाठी आणि आम्हा सर्वांसाठी तुला एवढे केलेच पाहिजे.

 पत्र मिळताच तुझ्या आईला, आणि मालूला घेवून ये. आम्ही वाट पहात आहोत.

तुझे,

रघुकाका

 मनाच्या कोणत्या अवस्थेत पत्र वाचताना मी होतो ते माझे मलाच कळत नव्हते. कारण आईने रघुकाकांकडे जायचे ना ? असं केव्हां विचारलं आणि माझ्या तोंडून 'हं' केव्हा गेलं ते माझं मलाच कळलं नाही.

निखळलेलं मोरपीस / ५५