पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणार? चला, आपल्याला तो वॉकमन घ्यायचाय ना? तोच आज घेऊन टाकावा. सगळे कसे चकित होतील! मी मनाशी विचार करत होतो.

 मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कसातरी तग धरून बसलेला कारुण्यमूर्ति गौतमबुद्ध पार मरून पडला होता नि माझ्या अंतर्यामातील भोगवादी सिद्धार्थ त्याच्या उरावर स्वार होऊन बसला होता.

 मला मात्र त्यातलं काहीच दिसत नव्हतं!

निखळलेलं मोरपीस / १५