पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतं एक वेळंचं, तर कोण म्हणतं जेवण अजिबात वर्ज्य कर आणि दूध आणि फळं एवढाच आहार ठेव. मी एक बघितलंय. आपल्याकडे बाकी वस्तुंचे कितीहि तुटवडे पडोत पण सल्ला देणारांचा तुटवडा कधीच पडत नाही. त्यातहि विशेष म्हणजे प्रत्येकजण आपलाच सल्ला कसा बिनतोड आहे हे अगदी छातीठोकपणे सांगत असतो. तेव्हा या मतामतांच्या गलबल्यात मी पार गडबडून गेलो आहे.

 तुमचा काय सल्ला आहे?

निखळलेलं मोरपीस / १३१