पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मनात एक शंका होती. हिला एवढ्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या? डायरीत एवढ्या नोंदी दिसत नव्हत्या. माझ्या मनातलं ओळखल्यासारखं जगनच्या सासऱ्यानी एक पत्र दाखवलं. जगननं ब्रीफकेस माझ्याकडं दिल्यावर त्यांच्याकडे एक खुलासेवार पत्र पाठवलं होतं.

∗∗∗

काही दिवसातच जगनच्या ब्रीफकेसने अनेक रहस्ये उलगडली. कित्येक स्मगलर्स गजाआड झाले. डिपार्टमेंटची मोठी धेंडं तडकाफडकी डिसमिस झाली. जगनच्या इमानदारीबद्दल त्याला मरणोत्तर पारितोषिके, सन्मान प्राप्त झाले. माझाहि सरकारतर्फे सन्मान व्हावा म्हणून जगनच्या सासऱ्यांची आणि बायकोची फार इच्छा होती. त्यासाठी ते प्रयत्न करणार होते. माझा पण गौरव होणार होता. पण माझ्या बायकोनं या कल्पनेला विरोध केला. माझं नाव कोणत्याहि प्रकारे प्रकाशात येऊ नये म्हणून ती ठाम होती. आणि आम्हा पांढरपेशांच्या दृष्टीकोनातून ते रास्तहि होतं!

 आणि न दाखवलेल्या धाडसाबद्धल सन्मान तो कसला? जगनमुळे राष्ट्रकार्यात माझा नकळत हातभार लागला हेच माझ्या लेखी खूप होतं!

(सर्व पात्रे, प्रसंग काल्पनिक)

बॉम्बस्फोट / १२०