मुंबई बंदरांत बोट आल्याबरोबर प्रथम त्यांस पोलिस कमिशनर भेटले. गोपाळरावांनीं सांगितलें कीं, मला आधीं घरीं जाऊं द्या; मी पुरावा मिळविण्याची खटपट करीन आणि मग काय तें जाहीर करीन. आतां मला कांहीं एक करितां येणार नाहीं. गोपाळराव घरी आले. सर्व मित्रांच्या त्यांनी भेटी घेतल्या. परंतु पुरावा कोणीच देईना. आतां काय करावयाचें? आपण तर सर्व युरोपियन राष्ट्रांत इंग्लंडच्या शिपायांची नाचक्की करून बसलों! आणि तें विधान सप्रमाण सिद्ध करितां तर येत नाहीं!! गोपाळरावांच्या मनाची काय स्थिति झाली असेल याची कल्पनाच करणें बरें. त्यांच्या जिवास रुखरूख लागली. मन खाऊं लागलें. आपल्या गुरूची त्यांनी सल्ला घेतली. कठिण प्रसंगांत गुरूशिवाय कोण मदत करणार? रानड्यांनीं त्यांस जाहीर माफी मागण्यास सांगितलें. गोखल्यांस ही गोष्ट कमीपणाची वाटली पण रानड्यांचें नीतिधैर्य थोर. त्यांनीं सांगितलें कीं, आपली चूक कबूल करणें यांत मनाचा मोठेपणा आहे; मानखंडना नाहीं. सज्जन जे आहेत ते तुमचें कौतुकच करितील. हेंच करणें रास्त व श्रेयस्कर आहे. गोखले हो ना करीत होते, परंतु शेवटीं गुरूच्या उपदेशाप्रमाणें वागण्याचे त्यांनी ठरविलें. रानड्यांचा शब्द ते कसा मोडतील? रानड्यांस आपल्या करणीनें जर संतोष होत असेल तर त्रिभुवनाच्या निंदेसही ते भिणारे नव्हते. इंग्लंडमधील माझी साक्ष जर तुम्हांस पसंत पडली असेल तर माझें सार्थक झालें असें रानड्यांस त्यांनी लिहिलें होतें. 'If you find time to go through the statements and feel satisfied, I shall have received the only reward I care.' तेव्हां ज्यांना ते सर्वस्व समजत असत, त्यांच्या सांगीप्रमाणे ते वागणार नाहीत तर कोणाच्या? पुढे एकदां बाबू मोतीलाल घोष यांनीं रानड्यांजवळ या माफीचा खुलासा विचारला तेव्हां त्यांनी सांगितळें की, गोखले तयार नव्हते, परंतु आपण त्यांचे मन वळविलें, मोतीलाल, 'A step in the steamer' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात: "He was willing to stick to his words, but was prevented
पान:ना. गोखले चरित्र.pdf/९८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माफी - प्रकरण.