from doing so by his Guru-Mr. Ranade whom he could not disobey. In the course of a conversation Mr. Ranade assured me that the entire responsibility for Gokhale's apology was his and Gokhale simply followed his advice." स्वतःच्या शब्दांस चिकटून राहण्याच्यां गोखल्यांच्या निश्चयास मोतीलाल ('Fairness') 'चांगुलपणा' म्हणतात. आम्हास तसे वाटत नाहीं. जी गोष्ट आपणास सिद्ध करितां येत नाहीं आणि ज्या गोष्टीमुळे दुसऱ्याची आपण निंदा केली, ती गोष्ट सपशेल परत घेऊन माफी मागणे हेंच न्याय्य होय. आपला शब्द जर खरा करून दाखवितां येत नाहीं तर त्यास चिकटून राहण्यांत मोठेपणा किंवा धैर्य नाहीं. अशा वेळीं आपला अपराध कबूल करण्यासच अलौकिक धैर्य लागतें आणि यासच आम्ही नीतिधैर्य म्हणतो. आपल्याच लोकांत मनोधैर्य कमी म्हणून गोपाळरावांवर हा नामुष्कीचा प्रसंग आला, जर आपल्या विधानासाठी त्यांनी पुरावा पुढे मांडला असता तर गोपाळरावांस आपले शब्द खरे करतां आले असते. पण त्यांच्या पत्रलेखकांनी त्यांस आगाऊच केविलवाणी विनंति केली होती. या भ्याड लोकांच्यामुळे गोपाळरावांस माफी मागावी लागली! जर लोक पुढे येत नाहींत, पुरावा देत नाहींत तर आपलीच विधाने जरी तीं ईश्वराच्या दृष्टीनें (कारण तोच फक्त सर्वसाक्षी आहे) खरी असली तरी जगामध्ये खरी ठरत नाहींत. आणि तीं खरीं न ठरल्यामुळे ज्यांच्यावर त्या विधानांनीं दोषारोप केले होते त्यांची माफी मागणे हाच राजमार्ग आहे. गोपाळरावांनीं हा मार्ग स्वीकारला याबद्दल त्यांचे जितकें कौतुक करावें, त्यांच्या धैर्याची जितकी तारीफ करावी तितकी थोडीच होईल.
युरोपांत हा माफी मागण्याचा प्रघात सर्वमान्य आहे. गोखल्यांनी माफी मागितल्यामुळे सरकारचें समाधान झालें, इंग्लंडमधील पत्रांची तोंडें बंद झाली. तेथील मित्रमंडळींचीं गोखल्यांस सहानुभूतिपर आणि समाधानदर्शक पत्रे आली. या माफीचा त्यांस पुढे फार उपयोग झाला. जबाबदारपणें आणि विचारपूर्वक कोणतीही गोष्ट करण्याचा त्यांनीं धडा घेतला. अधिकारीवर्गास वाटलें कीं, हा पुरुष न्यायी आहे. उगीच
पान:ना. गोखले चरित्र.pdf/९९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७
केवळ गुरुच्या इच्छेसाठी.