मित्रांनीं जें लिहिलें तें अगदीं खरें आहे अशी त्यांची मनोभावना त्यांस सांगत होती. परंतु मुंबई सरकारच्या आव्हानास 'ओ' देऊन कोणीच गृहस्थ पुढें कसा झाला नाहीं याचें त्यांस आश्चर्य वाटले, आपल्या लोकांत नीतिधैर्य नाहीं असें त्यांस वाटले असेल काय? इंग्लंडांतील पत्रांनीं गोखल्यांवर शिव्याशापांचा नुसता पाऊस पाडला. पार्लमेंटांत एका सभासदाने तर त्यांस Despicable perjurer म्हणजे खोटीं व निंद्य कुभांडें रचणारा असा आहेर अर्पण केला. 'सहसा विदधीत न क्रियाम- विवेकः परमापदां पदम्' हा अमोल उपदेश संतापाच्या व भावनांच्या भरांत दृष्टीआड झाला. आपल्या लोकांचीं दुःखें व जुलूम तेथील लोकांस कळावी या सद्धेतूनें त्यांनी सर्व केलें. आपली विधाने खरी असे त्यांस वाटत होतें, परंतु सज्जनांच्या अंतःकरणप्रवृत्तीला कोठें जगांत मान्यता मिळते? जे काय प्रत्यक्ष सिद्ध होईल त्याच्यावर जगाचा भरवसा. करावयास गेले एक आणि झाले भलतेच! इंग्लंडमध्ये सुरेख साक्ष दिली होती, परंतु तें यश पार नाहींसें झालें. परक्या देशांत परकी लोकांचे वाक्प्रहार त्यांस सोसणें भाग होतं. त्यांचे मन द्विधा झालें, अंतःकरण विदीर्ण झाले, ते हिंदुस्तानास यावयास निघाले. वाच्छांबरोबर युरोपला जाण्याचा आपला बेत त्यांनी रद्द केला. हिंदुस्तानांत जाऊन आपल्यास आपली विधाने खरी करून दाखवितां येतील काय हाच प्रश्न त्यांच्या अंतश्चक्षूंपुढे होता. बोटीवर त्यांस फार त्रास झाला. सिव्हिलियन् लोक 'हाच आमच्या शिपायांचे वाभाडे काढणारा' असे त्यांच्याकडे बोट दाखवून सांगूं लागले. एका सिव्हिल सर्वंटाने मात्र त्यांच्या दुखावलेल्या मनास धीर दिला. गोखल्यांची बोट एडनला आली. एडनला कांहीं मित्रांचीं त्यांस पत्रे मिळाली. हीं पत्रें ज्यांनी इंग्लंडमध्ये त्यांस पुण्यांतील हलकल्लोळाचीं पत्रे लिहिली होतीं त्याच सद्गृहस्थांचीं होतीं. आमचीं नांवें सरकारांत कळवूं नका आमच्या नांवांची परिस्फुटता- वाच्यता न होऊ देण्याची खबरदारी घ्या अशी विनंति या पत्रांत मोठ्या कळवळ्यानें केली होती. गोखल्यांनी सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर घेण्याचें नाहीं तरी ठरविलें होतें. आपली एक मानखंडना झाली तेवढी पुरे- आपल्या बरोबर इतरांची नको हाच उदार विचार त्यांनी मनांत धरिला होता.
५ – गो. च.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/९७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५
पुराव्याच्या अभावीं गोखले माफी मागतात.