of social reform; the other does not wish to go much beyond the circle of the friends of reform " सुधारणावादी लोकांस जनतेस बरोबर घेऊन जावयास नको होतें. ते अलग वागत. डेमॉक्रसीचें महत्त्व त्यांस तात्त्विकदृष्ट्या कळे, परंतु तें त्यांस व्यवहारांत (पटत नसे) आणतां येत नसे. टिळक हे नेहमी लोकांस बरोबर घेऊन जावयाचे. बरोबर नेतांना त्यांस शिकवावयाचे व शिकवीत शिकवीत बरोबर न्यावयाचे. यास सवंग लोकप्रियता असे उपहासास्पद नांव कित्येकांनी दिले असले तरी तें वस्तुतः भूषणच आहे. हीच गोष्ट २० डिसेंबर रोजी- काँग्रेसच्या आधीं ५-६ दिवस- काँग्रेससाठीं शहरात प्रतिनिधि निवडावयासाठीं भरलेल्या सभेंत दिसून आली. सभेस जागा अगदी लहान योजून आयत्या वेळीं सभा जाहीर केली. परंतु ही युक्ति सफळ झाली नाहीं, तेथे जुन्या मताचे लोकांचा सर्व समाज लोटला व त्यांनी स्वतःस पसंत असा अध्यक्ष निवडला. हे सर्व पाहून गोखले व इतर १५ इसम सभा सोडून चालते झाले; हा थोडा कमकुवतपणाच होता. टिळकांवर जो लोकच्छंदानुवर्तित्वाचा आरोप करण्यांत येतो तसाच आरोप प्रख्यात पंडित हक्स्ले हा, विख्यात इंग्लिश राजकार्यधुरंधर जो ग्लॅडस्टन, त्याच्यावर करीत असे. तो म्हणे, "He is a man with the greatest intellect in Europe and yet he debases it by simply following majorities and the crowd." परंतु हें लक्षांत ठेवणें जरूर आहे की टिळक, ग्लॅडस्टन यांसारखे पुढारी लोक केवळ जनतेच्या मतांप्रमाणे चालत नसतात. ते त्यांस शिकवीत तर असतातच, परंतु हळूहळू त्यांच्या मनांत भरवीत त्यांच्याशीं मिळतं घेऊन, मिळतें घेतांनाही आपला उद्देश सिद्धीस जातो आहे हें पाहून हे लोक पाऊल टाकतात; फटिंगपणे वागणें म्हणजे लोकप्रिय होणें नव्हे.
या वर्षीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक सभा रानडे पक्षाला सोडावी लागली ही होय. १८८९ पासून सार्वजनिक सभेत रानड्यांचें म्हणणें म्हणजे वेदवाक्य असें समजले जात असे. १८९५ साली टिळक हे बहुमतानें सार्वजनिक सभेचे पुढारी झाले. या गोष्टीनें जुन्या रानडे पक्षाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. गोखले हे नव्या-जुन्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न करूं लागले, परंतु तो दिलजमाईचा
४—गो. च.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/८१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९
टिळकांची सवंग (?) लोकप्रियता.