Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
वादाची मीमांसा.

बंडच करणार होते. परंतु सभा नीटपणें पार पडली आणि दंग्याधोप्याची भीति अवास्तव ठरली.
 पुष्कळ लोक टिळक क्षुल्लक गोष्टीसाठीं भांडले असा त्यांवर आरोप करितात. 'सामाजिक परिषदेसाठीं निराळी तयारी करावयाची म्हणजे पुनः आला नवीन खर्च; कांग्रेसचा मंडप मिळता तर त्यांतल्या त्यांत भागून गेलें असतें.' असाही या लोकांचा एक मुद्दा असतो. परंतु जनमतापेक्षां पैशाची जास्त मातब्बरी नाहीं, आणि ज्यांस सामाजिक सभा भरावावयाची होती त्यांस जर फार उमाळा होता तर त्यांनी त्यासाठी निराळी वर्गणी दिली पाहिजे होती. स्वार्थत्यागाशिवाय मत मात्र मिरवावयास पाहिजे. हें कसें चालेल? बहुजनसमाजास बरोबर घेऊन जाणें हें राष्ट्रीय सभेचे काम. ती राष्ट्रीय आहे, विवक्षित पंथाची नाहीं. सर्व लोकांस ज्यांची दरक्षणीं जरूर भासते अशा हक्कांसाठी राष्ट्रीय सभा आहे. हजारों वर्षे चालत आलेल्या धर्माचा विचार करणें हें लोकांस कसेसेच वाटे. 'आपल्या पायाखालीं कांहीं जळत आहे' असें लोकांस खरोखरच वाटत नसे. वाटत असतें तर त्यांनीं विझविण्याचा प्रयत्न केलाच असता. आपल्या डोक्यावर जे आज सरकारचें छत्र आहे त्यानें मात्र छाया होत नसून डोक्यावर आगच पाखडली जात आहे हें या जुन्या लोकांसही पटले होते आणि प्रत्यक्ष अनुभवास आलें होतें. या लोकांस राष्ट्रीय सभेतच फक्त यावयाचें होतें. त्यांस वगळून कसें चालणार? ही विचारसरणी रास्त आहे; न्याय्य आहे. सामाजिक सुधारणेचें स्तोम माजविणाऱ्यांस ती दिसणार नाहीं व दाखविली तरी पटणार नाहीं हें आम्ही जाणून आहों. टाइम्समध्ये ३ नोव्हेंबर १८९५ रोजी एक पत्र प्रसिद्ध झालें होतें. हा पत्रलेखक वरील मताचाच अनुवाद करितो. तो म्हणतो- "The congress eventually aims at being a congress of the people and the object cannot be achieved unless every year an effort is made to approach more and more the classes that have not taken hitherto much interest in the movement. One party wishes to draw to the congress as large a portion of the public as it possilby can irrespective of the question