Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
साधे भोळे गोखले.

णारा हा जो सुधारकी मेळा त्याचा त्यांना फार राग आला. राष्ट्रीय सभेस सुधारक पाहिजेत तसे जुन्या परंपरेचे लोकही पाहिजेत. तिच्यासाठी सर्वांनी आधीं धांवून गेले पाहिजे, असें असतां सामाजिक परिषदेबद्दलचा कांगावा करून राष्ट्रीय सभेवर रुसणाऱ्या या सुधारणावाद्यांच्या सोंगावर टिळकांनी कोरडे ओढले. राष्ट्रीयसभा सर्व मतांच्या लोकांची आहे हें स्पष्ट झाले पाहिजे. परंतु काँग्रेसची सूत्रे सुधारक पक्षाच्या हातांत; रानडे, गोखले, मुंबईचे मेथा, वाच्छा वगैरे लोक सर्व सुधारक. आपलेच म्हणणें धरून बसणारे हे लोक. रानड्यांनी या वेळेस सावध होऊन राष्ट्रीय-सभेच्या मतैक्यासाठी हा प्रश्न सोडविण्यास लागलें पाहिजे होते. परंतु रानड्यांनी कांहीं एक केलें नाहीं. गोष्टी कोणत्या थरावर जातात याचीच ते वाट पहात बसले. टिळकांनी सेक्रेटरीशिपचा राजीनामा दिला. तेव्हां या विरुद्ध पक्षाच्या लोकांस संशय वाटला. टिळकपक्षाचे लोक काँग्रेसच्या मंडपास आगसुद्धां लावण्यास मागें पुढे पाहणार नाहींत अशी कंडी उठली, ती या लोकांनींच उठविली असली पाहिजे. गोखले पडले भोळे. त्यांना ही हूल खरी वाटली आणि उतावीळपणानें त्यांनीं वाच्छांस तार केली कीं, असें असें आहे तरी ताबडतोब या. जणूं वाच्छा येऊन शहानिशा करणार होते! वाच्छांस स्टेशनवर पुष्कळ मंडळी सामोरी गेली आणि वाच्छांस 'हे सर्व खोटें आहे; आपण कां येण्याची तसदी घेतली?' असे प्रश्न लोकांनी विचारले, वाच्छांस गोपाळरावांच्या उतावीळपणाची कल्पना आली.
 शेवटी हा मंडपाचा वाद नियोजित अध्यक्ष सुरेंद्रनाथ बानर्जी यांच्या कानांवर गेला. त्यांनी असे कळविलें कीं, जर पुण्याच्या लोकांचें एकमत होत नसेल तर आपण अध्यक्ष होण्यास तयार नाहीं, धोंडा बरोबर लागला. रानडे जागे झाले. जी गोष्ट आधीच झाली पाहिजे होती ती दिरंगाईवर व 'पाहूं या काय होतें तें' अशावर टाकण्यांत आली होती. परंतु सोनारानें परस्पर कान टोचले म्हणजे दुखत नाहींत, किंवा नाक दाबले म्हणजे तोंड उघडते तद्वत् झालें. सभा व सामाजिक परिषद वेगवेगळ्या ठिकाणीं भरण्याचें ठरलें, या सुधारक पक्षाने पोलिसांस सुद्धां वर्दी देऊन ठेविली होती कीं, कदाचित् आम्हांस मदत लागेल! जणूं टिळक