टाळ्याला' म्हणजे केवळ 'मुखमस्तीतिवक्तव्यंम्' होय. तोंड आहे तर बडबडा. परंतु या बडबडीच्या पाठीमागें बुद्धि व विचार यांचा जोर नसेल तर ती बडबड म्हणजे बुडबुडा आहे- क्षणिक आहे. लोकांस, सुज्ञांस तें पटणार नाहीं व रुचणार नाहीं. याच्या उलट सर्व शस्त्रास्त्रांनी सिद्ध होऊन तुम्ही लिहाल, बोलाल तर लोकांस आणि सरकारासही तें निमुटपणे ऐकलें पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, लॉर्ड बीकन्सफील्ड म्हणत असे कीं, The only way to acquire mastery of public affairs is to study blue-books. गोखल्यांस निरनिराळीं- ग्रीनबुझें, रेडबुकें, ब्ल्यूबुकें, सर्व सरकारी कामांचे रिपोर्ट, आजपर्यंतच्या सर्व कायद्यांची माहिती, मासिकेँ, वृत्तपत्रे, सभांच्या बैठकींच्या हकीगती सर्वांचें सार काढण्यास रानडे सांगत आणि गोपाळरावांनीं तें लिहून आणले म्हणजे तें जर पसंत पडण्यासारखें असेल तर 'चालेल, बरें आहे' असे म्हणत, नाहीं तर 'ठेवा तेथें' असें म्हणत. ते फार स्तुति करावयाचे नाहींत, टीकाही करावयाचे नाहींत. मागून स्वतः त्यांत ते योग्य तो फेरफार करीत किंवा कधीं सर्वच निराळे लिहीत. 'राजनीतीचें परिशीलन खडतर तपश्चर्येप्रमाणें गोखल्यांनीं रानड्यांच्या सेवेंत राहून केलें. माधवरावांच्या बुद्धीचें सर्वांगीणत्व, व्यापकत्व, कुशाग्रत्व, गोखल्यांच्या बुद्धींत कदाचित् नसेल; पण तिचें सर्वस्व एका प्रवाहांत आणिल्यामुळे व तिला अल्प अल्प नाना शाखांत वळू न दिल्यामुळें, तिचा लोट अनिवार होऊन तिनें गोखल्यांस प्रथम प्रांतिक, मग अखिल भारतीय व अखेर ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत धुरीणाच्या पदास पोंचविलें आणि शिष्य गुरूपेक्षांही कांकणभर सरस ठरला. या दिव्य अशा भावि यशासाठी आज ते मन लावून आपल्या गुरूजवळ सर्व प्रश्नांचा अभ्यास करीत होते. टांकीचे घाव सोसल्याविना देवकळा येत नाहीं; एकदम शिखर गांठणें शक्य नसतें; चढत गेलें पाहिजे. आज परिश्रम केले, खस्ता खाल्या तर त्याचा रमणीय परिपाक पुढे दिसेल; परंतु आज कांहींच न केलें तर पुढे काय मिळणार? रानड्यांबरोबर ते आतां सर्व देशाच्या भवितव्यतेबद्दल खल करूं लागले. १८८५ सालीं प. वा. ह्यूम साहेब यांच्या पुरस्कारानें राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. ह्यूम
पान:ना. गोखले चरित्र.pdf/६७
Appearance