साहेबांनी पाहिलें कीं देशांत असंतोष माजत आहे. नवीन सुशिक्षितांमध्यें असमाधान आणि चालू परिस्थितीबद्दल त्वेष उसळत आहे. सरकारविषयीं संताप आणि दिवसेंदिवस वाढते दारिद्र्य या दोहोंच्या दलदलीतून कोणकोणते रोग फैलावतील याचा अंदाज ह्यूम साहेबांनी केला आणि वेळीच सावध होऊन भावि रोगांच्या चिन्हावर आजच आपण उपाय शोधूं या असे देशाची नाडीपरीक्षा करणाऱ्या अन्य भिषग्वर्यांना त्यांनी कळकळीने सांगितलें. नवीन तरुणांपुढे देशास सुस्थिति जेणेंकरून प्राप्त होईल असा मार्ग आपण ठेवू या असें या उदार मनाच्या पुरुषाचें मत पडलें. 'वसुधैव कुटुंबकम्' असे महात्मे प्रत्येक देशांत असतात. त्यांतलेच ह्यूम, बेडरबर्न वगैरे महात्मे होत. देशांतील सुशिक्षितांचें लक्ष एका विवक्षित प्रश्नावर खिळविण्याचे श्रेय यांनाच आहे. हतबल राष्ट्राला हाताशी धरून ते आपलेच आहे असें समजून, त्याच्यासाठीं खटपट करणें यास किती थोर मन लागेल बरें? ह्यूम साहेबांनी प्रथम १८८३ च्या मार्चच्या पहिल्या तारखेस कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास उद्देशून एक जाहीरपत्रक काढलें होतें. बंगाली तरुणांना कर्तव्याची जाणीव करून देणारा तो जळजळीत उपदेश होता. संघटना करा, यत्न करा ही सूत्रे त्यांत ग्रथित केली होतीं. हा उपदेश, हें आव्हान, स्फूर्तिदायक आहे. पुढे या, मागें जाऊं नका असे त्यांत मुक्तकंठानें सांगितले आहे. तो उपदेश खालीलप्रमाणें आहे.
"If you the picked men, the most highly educated of the nation cannot, scorning personal ease and selfish objects, make a resolute struggle to secure greater freedom for yourselves and your country, a more impartial administration, a larger share in the administration of your own affairs, then we your friends are wrong and your adversaries right, then are Lord Ripon's noble aspirations for your good fruitless and visionary, then at present at any rate, all hopes of progress are at an end, and India truly neither lacks nor deserves any better government than what she enjoys at present."
पान:ना. गोखले चरित्र.pdf/६८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
ह्यूमसाहेबांचा बंगाली विद्यार्थ्यांस उपदेश.