स्वार्थरहित बुद्धीनें त्यांनीं हें काम केलें. सार्वजनिक सभेचा त्या वेळीं सर्वत्र बोलबाला होता. सरकारांत तिच्या शब्दास मान असे, वजन असे. देशाचें म्हणणें, रयतेच्या तक्रारी, गाऱ्हाणीं, नीटपणे मुद्दे काढून सरकारापुढे मांडावयाचें काम सार्वजनिक सभा जितक्या जवाबदारपणें करी तसे इतरत्र होत नसे. हे काम अर्थात् रानड्यांचं असे. सर्व विषयांचा त्यांनीं सांगोपांग अभ्यास केलेला; विवेचक दृष्टि, समतोल मन, दुसऱ्याच्या अडचणी डोळ्यांआड न करू देण्याचा त्यांचा निश्चय, या सर्व गुणांच्या समन्वयामुळे त्यांच्या लिहिण्यास भारदस्तपणा आणि महत्त्व येई. याशिवाय सरकार अमुक एक कायदा करणार आहे अशी कुणकुण समजतांच ते तो साधक बाधक रीतीनेच चव्हाट्यावर आणीत, लोकमत तयार करीत आणि ते वेळीच सरकारच्या नजरेस आणीत. सरकारवरील टीका अशा स्वरूपाची असावयाची कीं, सरकारास ती कबूल करणें भाग पडे. मग सरकार आपली चूक कबूल करो वा न करो. नैतिक दृष्ट्या सरकारच्या वर्तनाचें समर्थन होऊ शकत नाहीं हेंच त्यांस मुख्यतः दाखवावयाचें असे. सभेच्या त्रैमासिकाचे संपादकत्व जरी गोखल्यांकडे आले तरी रानडेच बहुतेक मजकूर लिहीत. अद्याप गोपाळराव त्यांत लिहिण्यास धजत नसत. सभेचे चिटणीस झाल्यावर जास्त व्यापक प्रश्न त्यांच्यासमोर येऊ लागले; व त्यांचा मार्मिक अभ्यास त्यांस करावा लागे. असा अभ्यास चालला असतां एकदां रानड्यांनीं त्रैमासिकाकरितां एक लेख लिहिण्यास गोखल्यांस सांगितलें. गोपाळरावांनी नीट काळजी घेऊन लेख लिहिला आणि गुरूजवळ आणून दिला. लेख पाहून. 'चालेल; द्या छापावयास' असें माधवराव म्हणाले. रानड्यांच्या या होकारदर्शक शब्दांनीं गोपाळरावांस किती आनंद झाला असेल याची बरोबर कल्पना आपणांस येणार नाहीं. त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असेल. त्यांचे मन आनंदले असेल. रानड्यांसारख्या लोकोत्तर व विशाल बुद्धिमत्तेच्या लोकाग्रणीनें आपला लेख 'चालेल' असे म्हणावें, हें आपलें केवढें भाग्य असे गोखल्यांसारख्या गुरुभक्तिपरायण शिष्यास वाटले असण्याचा संभव आहे. रानड्यांची शिकवणूक खऱ्या गुरूची शिकवणूक होती. पारमार्थिक ज्ञान होऊन शिष्याचें कल्याण
३ – गो. च.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/६५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
गोखल्यांचा लेख रानडे पसंत करतात.