आपले पाय खच्ची करून घेण्यांत, आपण पंगु आहों असा जप करण्यांत काय पुरुषार्थ आहे? हातपाय तुटल्यावर मनुष्य धांवणार कसा? पुढे घुसणार कसा? दुसरे आपले हातपाय तोडतील तर त्यांस अटकाव केला पाहिजे. निदान आपण तरी आपलाच घात करूं नये, आपल्याच पायावर स्वतःच्या हातून धोंडा पाडूं नये हें तत्त्व शास्त्रीबोवांनीं नवीन तरुणांस उपदेशिलें. आत्मस्तुति करणें जर वाईट तर आत्मनिंदाही वाईट. सर्व कांहीं प्रमाणांत असलें पाहिजे. परंतु शास्त्रीबोवा तत्त्वच उपदेशून राहिले नाहींत तर तत्त्वाप्रमाणें कृति करण्यासही ते लागले, रुपेरी शृंखलांत निगडित होऊन स्वजनहित उत्तम रीतीने पार पाडतां येणार नाहीं म्हणून ती तोडून हा नरसिंह रणांगणांत आला. पुण्यास नवीन शाळा उघडण्याचा त्यांनीं विचार केला. त्यांचा विचार ऐकून, आधींच त्यांच्या लेखांनी देशकार्यार्थ उयुक्त झालेले. टिळक आणि आगरकर त्यांस येऊन मिळाले. रानड्यांनीं त्यांस नामजोशांची सुंदर जोड दिली. आगरकर आणि टिळक यांचे कॉलेजमध्ये वादविवाद होत आणि ज्यावर त्यांचे मतैक्य झालें तो प्रश्न म्हणजे शिक्षण हा होय. लोकांस आधीं सुशिक्षित केलें पाहिजे आणि तें शिक्षण आपल्या हातांत पाहिजे, हा त्यांचा विचार ठाम झाला होता. आगरकर अठराविश्वे दारिद्र्यांत वाढलेले, स्वजनांनी टाकलेले आणि लोकांनी हेटाळलेले. रा. ब. महाजनींनी वर्गात कटु बोल उद्गारले, त्या वेळेस तुमच्याप्रमाणेंच एम्. ए. होईन असें स्वच्छ सांगून विकाटीने आणि धैर्यानें ते एम्. ए. झाले. तर्क, न्याय आणि नीतिशास्त्र हे त्यांचे विषय होते. देवाधर्मावरचा त्यांचा विश्वास उडाला असला तरी स्वजनहिताचा नवा मार्ग त्यांस दिसला होता. त्यांस वाढत्या पगाराची सरकारी नौकरी मिळाली असती, परंतु त्यांनीं आपल्या आईला लिहिले की 'आई' मी मोठी नौकरी करणार नाहीं. मी देशकार्यास वाहून घेणार आहें. असला लोकोत्तर स्वार्थत्याग लोकांस जागें केल्याशिवाय कसा राहील? लोकांची दृष्टि या तरुणाकडे गेली. त्यांस पुढें प्रख्यात संस्कृतज्ञ आपटे मिळाले. जास्त तरुण मिळत चालले. शाळा भरभराटत चालली. चिपळूणकर शाळाच काढून थांबले नाहीत तर त्यांनी केसरी आणि मराठा हीं दोन साप्ताहिकें पण सुरू केलीं. अलीकडच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/४७
Appearance