सहाध्यायी त्यास 'पाठ्या,' 'घोटया' असें म्हणून चिडवावयाचे; परंतु गोपाळास यामुळे संताप न येतां उलट 'इतरांस जें करितां येत नाहीं तें आपण करितों' असें वाटून त्यास समाधान वाटे. आपण इतरांच्याहून कमी आहों हा विचार त्यास खपत नसे, खेळांतही आपणास सर्व खेळ, क्रिकेट, पत्ते, बुद्धिबळें, सोंगट्या, गंजिफा, बिलियर्ड, सर्व कांहीं आलें पाहिजे असें त्यास वाटावयाचें आणि नुसतें मनांत वाटूनच तो थांबत नसे तर तदनुरूप प्रयत्नही करावयास लागावयाचा. हा त्याचा गुण अगदी मरेपर्यंत होता. बोटीवर खेळाची संवय करीत असतां त्यास एकाने विचारलें 'येवढे त्या खेळांत लक्ष देण्यासारखे काय आहे?' गोपाळ म्हणाला, "खेळांमध्ये सुद्धां आम्ही युरोपियनांची बरोबरी करूं शकतों हें आम्हीं दाखविलें पाहिजे. आमचा देश कशांतही मागें नाहीं, हें जगास दाखविलें पाहिजे, जो उत्तम क्रिकेट खेळून देशाची कीर्ति वाढवितो तोही देशभक्तच आहे." जी पुढे देशाविषयींची भावना होती ती प्रथम पिंडात्मक होती, स्वतःभोवती होती. आपणामध्येही कांहीं तरी पाणी आहे, करामत आहे, अगदीच कांहीं नादान, टाकाऊ आपण नाहीं हें दाखवावेंसें त्यास वाटे. यामुळे मुलांच्या थट्टेकडे त्याचें लक्षही नसे. मुलं 'घोक्या' म्हणाली तर जास्तच पेटून गोपाळ आणखी जोराजोराने पाठ करून यावयाचा. अशा रीतीनें कॉलेजांतील क्रम चालला होता.
ज्या वेळेस गोपाळ कोल्हापुरास शिकत होता त्यावेळेस महाराष्ट्रांत जी धामधूम उडाली होती, जो धूमधडाका चालला होता त्याचा प्रतिध्वनि कोल्हापुरासही ऐकू आल्याविना कसा राहील? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेनें एक प्रकारवें नवचैतन्य मृत राष्ट्राच्या देहांत ओतण्यास आरंभ केला होता. रानड्यांचे कार्य जास्त व्यापकपणें परंतु धिमेपणानें चाललें होतें. शास्त्रीबोवांनी त्यावेळच्या कित्येक पुढाऱ्यांनी चालविलेले आत्मनिंदेचें कार्य बंद पाडलें आणि लोकांत तेज आणि आत्मविश्वास उत्पन्न केला. राष्ट्राचा तेजोभंग करून राष्ट्र मेलेले असलें तर तें कायमचें मरावें या आत्मनिंदेला आळा घालून आत्मविश्वास अंतरी जागवा आणि त्यास निश्चयाचें पाणी घाला असे शास्त्रीबोवांनीं आपल्या तेजोमयी लेखणीनें राष्ट्रास पटविलें. आत्मनिंदा करून आपणच
पान:ना. गोखले चरित्र.pdf/४६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
घोक्या गोपाळ.