दिली. परंतु काय? गोपाळ ओक्साबोक्शी रडूं लागला. आनंद व सुख होण्याऐवजी गोपाळाचे डोळे पाण्याने भरले? गुरुजी बुचकळ्यांत पडले आणि मुलें चकित झाली. "गोपाळ तूं कां रडतोस?" गुरुजींनीं विचारलें. 'माझें गणित बरोबर असले तरी तें मीं स्वतः सोडविलें नाहीं. मी तें दुसऱ्यांच्या मदतीनें केलें. मला पहिला नंबर नको.' गोपाळाच्या मताला सत्य प्यार वाटे. रानडे हेही याप्रमाणेच सत्यप्रिय होते. मनाचा हाच सूक्ष्म तराजू गोपाळाजवळ मरेपर्यंत होता. पुढे पुढे तर तो जास्तच सूक्ष्म झाला. दुसरी एक गोष्ट आहे ती खेळतांना झाली. आट्या- पाट्यांचा खेळ रंगांत आला होता. गोविंद व गोपाळ विरुद्ध होते. गोविंद गोपाळास म्हणतो, 'गोपाळ, मला सोडून दे. मला धरूं नको.' छे भाऊ, असें कसें म्हणतोस? मी पाहिजे तर खेळ सोडून जातो. परंतु खोटें करून माझ्या बाजूच्या गड्यांचें मी नुकसान करणार नाहीं. लहानपणींचा खरें बोलणारा गोपाळ मरेपर्यंत तसाच होता. 'जे गुण बाळा, ते जन्म काळा' म्हणतात तें यथार्थ आहे. या प्रकारें कागलास मनाची व शरीराची प्राथमिक तयारी- पहिला विकास चालू होता.
गोपाळ दहा वर्षांचा होईपर्यंत कागलासच होता. त्याचे मराठी शिक्षण येथेंच झालें. मराठी शिक्षणानंतर त्यास वडील भावासह कोल्हापुरास इंग्रजी शिकण्यासाठी पाठविण्यांत आलें. 'गोविंद गोपाळ हे दोघे बंधु' एकमेकांवर फार प्रेम करीत. त्यांचा इंग्रजीचा अभ्यास जोराने चालला होता. या वेळेस लोकहितवादी किंवा रानडे यांच्या वेळी असणारा इंग्रजीविरुद्ध कटाक्ष नव्हता. आतां जगांत पुढें येण्यास इंग्रजीची फार जरूर होती. मुसलमानी अमदानीत ब्राह्मण जसे फारसी पंडित होऊन मोठमोठ्या सन्मान्य नौकऱ्या पटकावीत त्याप्रमाणे मोठ्या पगाराची जागा मिळण्यासाठीं आतां इंग्रजीशिवाय गत्यंतर नव्हतें. गोविंद गोपाळ सुट्टीत वगैरे घरी जात असत.
याप्रमाणें दोघां भावांचें शिक्षण चाललें असतां अकस्मात् संकट ओढवलें, कोणालाही न चुकणारा, कधीं तरी येणारा मृत्यूचा हल्ला गोपाळरावांच्या वडिलांवर आला. मुलें अद्यापि शिकत होती. घरांत मिळवितें कोणी नाहीं अशा वेळी कुटुंबवत्सल माणसाची एकाएकी मृत्यूने उचलबांगडी करावी
पान:ना. गोखले चरित्र.pdf/४०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८
गोपाळाची सत्यनिष्ठा.