नांवें अनुक्रमें जयरामपंत व माधवराव. अंताजीपंत आणि कृष्णराव हे लहानपणीच पोरके झाले होते. आईवेगळ्या लहान मुलांची किती आबाळ होते हें सर्वांस माहीतच आहे. हे दोघे भाऊ अगदीं एकचित्तानें रहात. अंताजीपंतांचे कृष्णरावांवर फार प्रेम असे. गोपाळरावांस त्यांच्याबद्दल अत्यंत पूज्यभाव वाटत असे.
कृष्णरावांचा स्वभाव जात्या फार हूड होता. त्यांस गावांत वाघोबा असें म्हणत असत. त्यांचा विवाह त्या काळास अनुसरून लहानपणींच झाला होता. चिपळुणापासून जवळच असलेल्या कोतळूक गांवचे खोत भास्करपंत ओक यांची मुलगी वालूबाई हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. वालूबाईचें नांव सत्यभामाबाई असे सासरी ठेवण्यांत आलें होतें.
कृष्णराव हे शिकण्यासाठी कोल्हापूरला गेले. कोल्हापुराला त्यांचे चुलते मामलतीच्या अधिकारावर होते. कृष्णराव कोल्हापुरास ज्या शाळेत शिकत होते त्याच शाळेत माधवराव रानडे हेही शिकत होते. कृष्णराव व माधवराव हे एकाच वर्गांत होते. हे माधवराव पुढें न्यायमूर्ति होऊन अखिल हिंदुस्थानच्या सर्वागीण उन्नतीचा मार्ग दाखवितील आणि ते आपल्या मुलाचे आध्यात्मिक आणि राजकीय गुरु होतील हे त्या वेळेस कृष्णरावांस कोणी सांगितलें असतें तर त्यांस काय वाटलें असतें? माधवरावांसही 'कृष्णरावांच्या मुलास तुम्ही राजकीय पुढारी होण्यास सर्वतोपरी पात्र कराल' असें जर कोणी सांगितलें असतें वर ते हंसले असते. कांहींही असले तरी हा योगायोग पाहून मनास आश्चर्य वाटतें खरें. कृष्णराव हे फारसे अभ्यासी नव्हते. घरची सांपत्तिक स्थितिही हलाखीची, यामुळे लवकरच त्यांस शाळेस रामराम ठोकावा लागला. व चुलत्याच्या वशिल्यानें त्यांस कागल संस्थानांत कारकुनीची जागा मिळाली.
कारकुनाची जागा मिळाल्यावर कृष्णराव सहकुटुंब कागलासच राहूं लागले. त्यांची पत्नी फार सुशील व देवभोळी होती. असेल त्यांत सुखानें संसार करून देवांब्राह्मणांस संतुष्ट करण्यांत तिचें सदैव लक्ष असे. सर्वांशी मिळतें घेऊन वागण्याच्या तिच्या स्वभावामुळे घरांत सदैव शांततेचें साम्राज्य असे. तिची पतिभक्ति इतकी सोज्वळ होती कीं, ती पाहून कौतुक वाटतें व आदर दुणावतो. पतिनिधनानंतर दुःखा
पान:ना. गोखले चरित्र.pdf/३८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६
वडिलांची हकीकत.