रत्नागिरी जिल्ह्यांत चिपळूण तालुका आहे. तालुका चिपळूण, पेटा गुहागर या भागांत वेळणेश्वर नांवाचें एक लहानसे खेडे आहे. सर्व गोखळे मंडळचें मूळ ठिकाण होय. येथूनच सर्व महाराष्ट्रभर गोखले मंडळी पसरली. गोखले मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. 'रास्ते' घराणें मूळचें गोखले घराण्यापैकींच. त्यांच्या रास्त वर्तणुकीमुळे शाहू महाराज त्यांस 'रास्ते' म्हणूं लागले. पेशवाईच्या पडत्या काळांत अतुल पराक्रमानें तिचें रक्षण करणाऱ्या बापू गोखल्यांचे नांव कोणास माहीत नाहीं? या गोखले मंडळीची एक शाखा चिपळुणापासून दहा मैलांवर ताह्मनमळा म्हणून गांव आहे तेथे बाळाजी महादेव गोखले यांनी प्रथम आणिली. पूर्वी कोंकणांत पुष्कळ उद्योगी लोक स्वकष्टानें पडीत जमिनी मशागतीस आणीत. दगडधोंडा बाजूस काढून, जंगल वगैरे तोडून तेथे गांव वसवीत. मग त्यांस तेथील गांवाचे खोती वगैरेचे अधिकार मिळत. हे अधिकार ते मग प्राण गेला तरी सोडीत नसत, मानहानि ही कोंकणांतील माणसास कधींच सहन होत नसते. गोपाळरावांचे निपणजे बाळाजी महादेव यांनी आपला मूळचा गांव सोडून हा नवीन गांव वसविला आणि आपला नवीन संसार थाटला. त्यांचा मुलगा भास्कर आणि भास्कररावांचे चिरंजीव श्रीधरपंत, श्रीधरपंत हे गोपाळरावांचे आजोबा होत. यांस प्रथम- कुटुंबापासून अंताजीपंत आणि कृष्णराव हे दोन मुलगे झाले. कृष्णराव दोनचार महिन्यांचेच असतांना त्यांची मातुश्री निवर्तली आणि श्रीधरपंतांनी द्वितीय विवाह केला. या द्वितीय विवाहापासून त्यांस दोन मुलगे झाले. त्यांची
पान:ना. गोखले चरित्र.pdf/३७
Appearance