झालेली होती. ज्या गोष्टीवर आपली आत्यंतिक श्रद्धा असते, हिची हेटाळणी, वाटाघाट कोणी केल्यास आपणांस राग येतो. परंतु गोखले आपल्या मनोविकारांवर दाब ठेवण्यास शिकले होते.
गोपाळरावांचा स्वभाव नादी होता. एकादी गोष्ट मनांत आली की कांहीं दिवस ते तिचाच पिच्छा पुरवावयाचे. एकदां लॅटिन शिकावयाचें मनांत आलें तेव्हां त्यांनी त्या विषयाची पुस्तकें मागविली. परंतु कांहीं दिवसांनी त्यांना त्या पुस्तकांची आठवणही राहिली नाहीं व पुस्तकें धूळ खात पडली. १९०० नंतर जेव्हां त्यांची द्वितीयपत्नी परलोकवासी झाली, रानडेही गेले, आणि १८९७ चे शल्य अजून टोचतच होते, अशा मनाच्या अत्यंत अशांत स्थितीत, त्यांच्या कांहीं मित्रांनी त्यांस गाणे शिकण्यास विनंति केली. गाणे ही एक दैवी कला आहे; हा पंचम वेद आहे; दुःखी जगाचा, त्रासाचा, उद्विग्नतेचा विसर पाडून निर्विकल्प अशा आनंदसागरांत पोहावयास लावणारी ही गायन कला धन्य होय! गाण्याच्या आलापाने विलापाचें परिवर्तन होते; हृदय हलके होते; मन मोकळे होते. गोपाळरावांस हें म्हणणें पटले आणि त्या वेळच प्रसिद्ध गाणारे बाळकोबा नाटेकर यांस त्यांनी आपणांस गायन शिकविण्यासाठी ठेविलें. लगेच सांगली- मिरजेहून तंबोरे, तबले, सतारी यांचा साग्र संच जमविला. परंतु शेवटी बाळकोबा म्हणाले, "तुम्ही जन्मभर शिकलां तरी तुम्हांला गाणें येणार नाहीं." हा अव्यापारेषु व्यापार होता. कारण गाणे ही ईश्वरी देणगी आहे. प्रत्येक मनुष्य कोणत्या तरी विशिष्ट कार्यार्थ निपजलेला असतो. सर्वत्र सारखे प्राविण्य मिळविणारा असा गटेसारखा एकादाच महापंडित निघतो. व्याख्यानें वगैरे देतांना जरी गोपाळरावांचा आवाज परिणामकारी असला तरी गाण्यांत कांहीं जमेना. शेवटी त्यांनी हा नाद सोडून दिला.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिरल्यानंतर त्यांस क्रिकेटचा तर फारच नाद लागला. भिडे म्हणून एक मुलगा उत्तम चेंडू फेंकणारा होता. 'जितके वेळां मला 'आउट' करशील, तितके आणे तुला देईन' अशी पैज लावून गोखले खेळावयाचे.
१९०७-८च्या सुमारास त्यांस योगाचाही अभ्यास करावयाची हुक्की आली. पुण्यांत त्या वेळेस कोणी एक आयंगार दवाखाना घालून होमि
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१
गोखल्यांचा अमर्याद नादी स्वभाव.