सुद्धां देशासाठीच आहे.' असो. खेळणेबिळणे त्यांस आवडत असे. कपड्यांत नोक झोंक नसला तरी देश तसा वेश ते करीत. कपड्याची घडी, इस्तरी बिघडूं नये म्हणून ते फार जपत. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी त्यांच्या कपड्यालत्यांविषयी विशेष काळजी घेत. परंतु एकंदरीत ते साधेच होते. त्यांचा पोषाख सभ्यतेसाठी असे; दिमाखासाठी नसे. त्यांस कसलेही व्यसन नव्हते. १८९७ पूर्वी ते चहा सुद्धां पीत नसत. इंग्लंडहून आल्यावर मात्र ते चहा घेऊं लागले. विडी, सुपारी वगैरेचें तर त्यांस वारेही नव्हतें. विडीच्या धुराचा वास त्यांस अगदी सहन व्हावयाचा नाही. त्यांच्या घरातील कोणा माणसाने विडी वगैरे ओढली असतां, त्यास जर गोपाळरावांनी बोलाविले. तर तो वेलदोडा, लवंग, कांहीं तरी खाऊन मग पुढें जावयाचा. एकदा दत्तोपंत वेलणकरांस कांहीं हिशोब पाहण्यासाठी गोपाळरावांजवळ जाण्याची वेळ आली. त्यांनी विडी ओढली होती. त्यांच्या खिशांत लवंगा व वेलदोडे असावयाचेच. ते वेलचीचे दाणे खाऊन गोपाळरावांपासून जरा दूरच बसले. 'असे इकडे जवळ बसा, लांब बसून कसे चालेल?' दत्तोपंत हळूच पुढे सरकले. विडीचा वास लपला नाही. 'तुम्ही विडी ओढली वाटते?' गोपाळरावांच्या समोर खोटं बोलण्याची प्राज्ञाच नसे. 'होय' असे दत्तोपंत म्हणाले, "आता तुमचं वयच आहे म्हणा ओढण्याचे !" येवढेच ते म्हणाले.
पुण्यास असले तरी ते सर्वदां सोसायटीतील आपल्या बैठकीच्या जागी असावयाचे. जेवणखाण सर्व तेथेच. फक्त दिवाळीच्या दिवशी आपल्या मित्रमंडळीसह घरी जाऊन फराळ करावयाचे. इतकें त्यांचे सोसायटीवर प्रेम असे. सोसायटीविषयी किंवा तिच्या उदात्त हेतूविषयी कोणी थट्टा केल्यास त्यांस आवडत नसे. एकदां नेव्हिन्सन् जेव्हां पुण्यास आला होता, तेव्हां त्यास व इतर मित्रमंडळींस गोखल्यांनी सोसायटीत फराळास बोलाविले. केळीचीं पाने वगैरे सर्व देशी थाट होता. नंतर विडे वगैरे झाले. गप्पागोष्टी निघतां निघतां 'इंग्लंड व हिंदुस्तान यांचा संबंध परमेश्वरानं आणला आहे'- आणि गोखल्यांच्या सोसायटीच्या ध्ययपत्रिकेतील 'Inscrutable Dispensation' या शब्दांविषयी वाद निघाला. सर्वजण हंसले; परंतु गोपाळरावांस हंसूं आलें नाहीं. त्यांच्या तोंडावर गांभीर्य व विचारसौंदर्य हींच प्रतिबिंबित
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
निर्व्यसनीपणा व सोसायटीवरील अपूर्व प्रेम.