Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९
गोपाळरावांची अद्वितीय भूतदया.

त्यांच्यांत होता. महाजनी लिहितात 'मनाचा मऊपणा आगरकरांत क्वचित् प्रसंगीच- आप्तसुहृदांच्या सहवासांत मात्र- दृग्गोचर होत असे. ज्याने जनतेच्या वेड्या समजुतींवर कोरडे ओढण्याचे व्रत पत्करिलें त्यास लोकांच्या पोटांत शिरून सहृदयतेनें कांटा थोडाच काढतां येणार? परंतु गोखल्यांची गोष्ट निराळी होती. डेक्कन सोसायटीस मिळतांना भावाचें मन कसें दुखवूं असें त्यांस झाले. वाच्छा म्हणतात की 'इंग्लंडमध्ये आम्ही दोघे एकत्र बसून पुष्कळ घरगुती गोष्टी बोलत असूं. मधूनमधून आमच्या डोळ्यांत अश्रबिंदुही चकमत.' या गोष्टीवरून गोपाळरावांचें मन दिसून येईल. तेही होतांहोईतो दुसऱ्याचे मन दुखवीत नसत. 'Treat others as you want to be treated by them.' हे त्यांस पक्के माहीत होतें. या त्यांच्या मनाच्या कोवळिकेचा पुढे फार उत्कर्ष झाला. पशुपक्ष्यांसही होत असलेली यातना त्यांस पहावत नसे. एकदा गाडीचें चाक लागून एक कुत्रा दुखावला तर ताबडतोब आपला शिपाई पाठवून त्या कुत्र्यास त्यांनी दवाखान्यांत पाठविलें. अशी दया त्यांच्यांत होती. त्यांचा पोषाख मोठा ठाकठिकीचा असे. १८९७ आणि १९०५ च्या वेळेस इंग्लंडांत ते पुष्कळदा तांबडे पागोटे घालीत. परंतु १९१३-१४च्या सुमारास ते इंग्लंडमध्ये बहुतेक युरोपियन प्रमाणेच वागत. सरोजिनीबाईस याचें आश्चर्य वाटले. ते मोठे मिळूनमिसळून वागणार होते. इंग्लंडमध्ये कधी गाण्यास, कधीं नाटकास ते आपल्या मित्रांबरोबर जात. त्याप्रमाणेच निरनिराळे खेळ खेळण्याचाही त्यांस नाद असे. प्रत्येक बाबतीत आपण कुशल असावें असें त्यांस लहानपणापासून वाटे. एकदां तर ते बारा तास पत्ते खेळत बसले होते. आपण जिंकूं असें त्यांस वाटे. क्रिकेटचा त्यांस नाद होता. सुधारकामध्ये 'क्रिकेट'वर वगैरे त्यांनी लेख लिहिले होते. एकदां एका बोटीत ते तिकडचा एक नवीन विलायती खेळ मोठ्या उत्सुकतेनें शिकत होते. एकाने त्यांस विचारलें- 'तो खेळ खेळण्यांत आपण येवढे कां दंग झाला आहां?' ते म्हणाले, 'आम्ही प्रत्येक खेळांत तुमच्या तोडीचे आहों; कोणत्याही गोष्टीत हिंदी मनुष्य मांगें पडत नाहीं हें आह्मीं दाखवून दिले पाहिजे. अशा बारीकसारीक गोष्टी सुद्धां आपण देशाच्या दृष्टीने कराव्या. रामतीर्थ म्हणत, 'माझा श्वासोच्छ्वास