Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१

टिळकांची योग्यता तेव्हां सामान्य शिक्षकाहून जास्त नव्हती. सामान्य योग्यतेचीं माणसें एकमेकांचा मत्सर करतात हा सिद्धांत खरा असल्यास टिळकांनी गोखल्यांचा मत्सर करण्यासारखी परिस्थिति १८८६-८७ सालांत होती, असें वरच्या वृत्तांतावरून दिसून येईल. टिळक मत्सर करीत होते कां नव्हते हा या स्थळीं वादाचा मुद्दा नाहीं. कोणताही पक्ष ठामपणानें स्वीकारतांना दोन्ही बाजूंचे सूक्ष्म निरीक्षण कां अवश्य हें समजण्याकरितां एवढे विवेचन केलें आहे.
 १८९५ सालीं पुण्यास कांग्रेसची बैठक भरली त्यापूर्वी पुण्यास कांग्रेसचा मंडप सामाजिक सुधारणेच्या परिषदेला देण्यांत यावा की न यावा या संबंधांत सुधारणेच्या विरोधकांनी दंगल सुरू ठेवली होती. सुधारणेच्या शत्रुपक्षाचें प्रथम प्रच्छन्न व पुढे उघड धुरीणत्व टिळकांनी अगिकारलें होतें. याविषयी मागल्या टिळक-चरित्रांतून नानाविध समर्थन लोकांसमोर येऊन गेलें आहे. रा. साने यांनीही या समर्थनाच्या धोरणानें आपला मजकूर लिहिला आहे. तसे कराना त्यांनी टिळकांइतकीच गोखल्यांची बाजू पहावयास हवी होती. गोखल्यांची बाजू त्यावेळी सुधारक ज्ञानप्रकाश आणि मुंबईचीं गुजराथी व इंदुप्रकाश ही पत्रे यांमध्ये प्रसिद्ध होत असे. ती नजरेखाली घालून वरील धोरण रा. साने यांनी पत्करल्याचे प्रमाण त्यांच्या लिहिण्यांत नाहीं. त्यामुळे गोखल्यांच्या बाबतीत तर अन्याय झाला आहेच, पण आश्चर्य हें की कांहीं विधानांत, टिळकांनीं जें म्हटलें नाहीं, ते म्हटल्याचा आरोप केला आहे. सारांश, रा. साने यांना त्या प्रकरणाचा यथार्थ बोध होऊन त्यांनी टिळकांचे मंडन केलें असा निष्कर्ष काढतां येत नाहीं. १९१५ मध्ये गोखल्यांच्या मृत्यूपूर्वी सुमारे पंधरा दिवस जी खडाजंगी कांग्रेसच्या समेटाबाबत चालली होती तिची हकीगत देतांना रा. साने यांनी अन्यायदर्शक वाक्यें लिहून टाकलीं आहेत. त्यांचा झोक टिळकांचा वाद सत्यास धरून होता असे दाखविणारा आहे. गोखल्यांवर टीका करतांना टिळकांनी जे कित्येक सिद्धांत केवळ अनुमानाच्या जोरावर खरे मानले, तेच रा. साने यांनीही खरे धरले आहेत. उदाहरणार्थ, श्री. सुब्बाराव यांनी लिहून काढलेले टिळकांशीं झालेल्या संवादाचें टिपण गोखल्यांनी पाहिलें होतें कीं नव्हतें, हें एकच