Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
टिळकांचें संघटनाचातुर्य व व्यवहारचातुर्य.

ते तुरुंगांत गेल्यावर राष्ट्रीय पक्ष कसा विस्कळित झाला, आणि तुरुंगांतून आल्याबरोबर पुनः जोमाचा संघटित पक्ष त्यांनी कसा उभा केला हें पाहिले म्हणजे संघटनाचातुर्य त्यांच्यांत होते हें निःसंशय ठरते.
 टिळकांचे व्यवहारचातुर्यही ते सुटून आल्यावर दिसून आले. 'परिस्थिति ओळखून तिच्यापासून फायदा करून घेणं हा गुण टिळकांत नव्हता' असें मेथा म्हणत. 'परंतु ते जर याही गुणानं युक्त असते तर मी त्यांस पूर्ण पुरुष म्हटले असते' असे ते गौरवाने म्हणत. दुर्दैवाने मेथा जगले नाहींत. टिळक कैदेतून सुटून आल्यावर त्यांनी परिस्थितीचे सिंहावलोकन केलं आपल्या व्यापक बुद्धीनं त्यांनी सर्व रागरंग तानमान जाणले; चवली किंमतीच्या मोर्ले मिंटो सुधारणा मिळाल्यामुळे आशेस जागा आहे असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. लढाईत सरकारात मदत करा; राजनिष्ठ रहा. 'सरकारने जर आम्हांस मानाने वागविले व हिंदी सैनिकांस योग्य जागा दिल्या तर मी हजारों सैनिक मिळवून देतो' असे त्यांनी जाहीर आव्हान दिले; कारण सरकारची नड ती आपल्या फायद्याची गोष्ट हे त्यांस पक्के एक माहीत होते. या वेळेस सरकारास मदत करूं तर मग वाटेल ते हक्क मागण्यास आपणांस हक्क आहे, मग सरकारला आपणांस अराजक असे नांव ठेवता येणार नाही असा त्यांनी कयास बांधला. ते विलायतेस गेले. फ्रान्समध्ये सर्व राष्ट्राच्या पुढे त्यांनी आपल्या देशाचा अर्ज पाठविला. सुधारणा पदरांत घेऊन कौन्सिलांत शिरून तीं लोकहितास कशी जाचक आहेत, प्रत्यक्ष फायदा त्यांमुळका हीच कसा होणार नाहीं हें सरकार व जगास दाखवून उरलेल्या चवदा आग्यांसाठी झटण्याची त्यांची योजना पाहून परिस्थितीचं यथार्थ आकलन त्यांस कसे करतां येई व परिस्थित्यनुरूप मार्ग कसा आंखीत हें स्पष्ट दिसते. परिस्थितीप्रमाणे मार्ग आंखणे म्हणजे पगडी बदलणे असंही पुष्कळ म्हणतील, परंतु मुत्सद्द्यांमध्ये हा प्रमुख गुण समजला जातो. दुसरा एक दोषारोप टिळकांवर करण्यांत येतो तो हा की, ते नवीन कल्पनांचे प्रवर्तक नव्हते. दुसऱ्यांच्या कल्पना घेऊन मग त्यांवर ते आपली तहान भागवीत. होमरूलची चळवळ बेझंट बाईनी सुरू केली; स्वदेशी बहिष्कार, या चळवळी बंगाल्यांत निघाल्या; परंतु त्या चळवळी सर्व देशभर कोणी पसरविल्या? टिळकांनां. केवळ कल्पना काढणारा मनुष्य आणि ती कल्पना आपलीशी करून ती सर्वांच्या हृदयांत ओतणे,