Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७
श्रेष्ठ कोण ? कल्पना-प्रसू की कल्पना-प्रसारक?

त्या कल्पनेचा लोकांस ध्यास लावणं, ही करामत करून दाखविणारा पुरुष यांत महत्वाच्या व तादृश फायद्याच्या दृष्टीने दुसऱ्याचेच गौरव कले पाहिजे. एकादी गोष्ट टिळकांनी उचलली की तिचा चारी दिशांत दुमदुमाट व्हावयाचाच. तिच्यासाठी ते पैशाकडे, प्रकृतीकडे पहावयाचे नाहीत, की कोणाशी झगडावयास डगमगावयाचे नाहीत. पिकेटिंग घेतलं तरी त्यांत सुद्धा त्यांनी एक प्रकारचं तेज आणले. तेव्हां टिळक केवळ कल्पना प्रसू नसले तरी या कल्पनांस बाळसे आणून ते त्या वाढीस लावीत. 'स्वराज्य' हा दादाभाईंनी उच्चारलेला शब्द प्रत्येकाच्या जिव्हाग्री टिळकांनीच नाचावयास लावला. हा जो त्यांनी स्वराज्याचा विचार सर्वत्र फैलावला त्याचेच महत्त्व आहे. नवीन विचारांच्या साम्राज्यालाच सरकार जास्त भिते. रसेल हा तत्त्वज्ञ म्हणतो - 'Men fear thought as they fear nothing else on earth- more than ruin, more even than death." नवीन विचारांची लोकांस प्रथम फार भीति वाटते. स्वराज्य हा शब्द उच्चारावयास आपण पूर्वी भीत होती, लोकांची ही भीती टिळकानी घालविली. परंतु जो जो लोकाची भीति नाहीशी होईल तो तो सरकारची वाढत जाईल. त्याला या नवीन कल्पना आत्महानिकारकच वाटतात. नवीन विचारांचं साम्राज्य सर्वत्र करण्यांत टिळकांनी अत्यंत धडाडी दाखविली यांत शंका नाहीं. गोडीगुलाबीचे काम टिळकांस व्हावयाचे नाही. यामुळे ते साम्राज्याचे मुत्सद्दी झाले नसते. शांतच्या काळांत गोखले होम-मेंबर झाले असते; परंतु टिळक आपल्या तत्त्वज्ञानाच्या किंवा गणिताच्या प्रश्नांतच गढून गेले असते. आर्किमिडीज हा शास्त्रज्ञ आपल्या देशासाठी लढला, परंतु लढाई संपल्यावर समुद्रकिनारी भूमितीचे सिद्धांत सोडवीत बसला. 'टिळकांनी गेल्या शतकांत राज्य कमाविलं असतें' असे गोखले म्हणत. त्याचप्रमाणे आम्ही म्हणतो, टिळक हे शंकराचार्याच्या वेळेस जन्मते तर जगद्विख्यात आचार्य झाले असते. कोणत्याही शतकांत ते चमकलेच असते. कारण त्यांची बुद्धिमत्ता सर्वंकषा होती. हिंदुधर्माचा अभिमानी, तत्त्वज्ञानांत रंगलेला कर्मयोगी, संकटांस न डगमगणारा अतुल पराक्रमी वीर, लोकांस, सर्व लोकांस- केवळ सुशिक्षितांच नव्हे- बरोबर घेऊन त्यांस राजकारणांतील मर्मे समजावून देत देत पुढे मोहीम करणारा हा सेनानायक,