णाचें आज जे बंधन आहे तशा प्रकारचें एकाच प्रकारचे बंधन समाजाला नाहीं. या टिळकांच्या धोरणास सवंग लोकप्रियता असें म्हणतात. परंतु कार्य करून दाखवावयाचें असतांना एकाच गोष्टीवर भर द्यावा लागतो; आणि सर्व लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो. नाहीं तर चार सुशिक्षित लोकांची चळवळ असें सरकारास सांगतां येतें. गोखले जरी समाजसुधारणेस अनुकूल असले तरी त्यांनाही राजकारण सोडून अन्यत्र फार जातां आले नाहीं हें लक्षांत ठेवले पाहिजे.
टिळकांनी सर्व जनतेला जागे करावयाचे काम हाती घेतल्यामुळे, जनतेला बरोबर घेऊन त्यांस जावें लागे. 'जनतेला बरोबर घेऊन जातात आणि टिळक लोकच्छंदानुवर्तित्व दाखवितात' असे इतर लोक म्हणतात; परंतु सामाजिक बाबतीत त्यांनी केवळ लोकच्छंदानुवर्तित्व दाखविले याचे कारण राजकीय बाबतीत त्यांना सर्व लोकांस एकत्र पुढे न्यावयाचे होते हें होय. हे काम करीत असतांना लोकांस राजकारण म्हणजे काय, परकी सरकार कसें असतें, त्याचे डावपेंच कसे असतात, प्रजेस हक्क कां पाहिजेत, या हक्कांसाठी आपण समर्थ कसे व कोणच्या उपायानें होऊं, उत्साह, धैर्य, उद्योग, दुर्दमनीय महत्त्वाकांक्षा यांचं सहाय्य का घेतलं पाहिजे, हें सर्व व्याख्यानद्वारां व पत्रद्वारा, ते रोज शिकवीत होते. ग्लॅडस्टनबद्दल हक्स्ले हे पंडित म्हणत की, "Here is a man with the greatest intellect n Europe and yet he debases it by simply following majorities and the crowd." असेंच टिळकांविषयीं पुष्कळ लोक म्हणतांना आपण ऐकती परंतु टिळक किंवा ग्लॅडस्टन केवळ लोकमताचं अंधपणे अनुकरण करीत नसत. ग्लॅडस्टन सुद्धां धार्मिक बाबतींत जुन्या परंपरेचा असे. हा जुन्या परंपरेचा अभिमान ग्लॅडस्टन लोकप्रियता संपादन करण्याठीच दाखवीत असे, असे कोण सुजाण मनुष्य म्हणेल? टिळकांसही जुन्यांपैकी पुष्कळ ग्राह्य असे वाटे, आणि म्हणून ते परंपरेस चिकटून होते. त्यांनी गणपतीपुढील व्याख्यानांत अनेक प्रसंग आपल्या धार्मिक कल्पनांचं समर्थन केलें आहे.
टिळकांस लोकांस असंतोष शिकवावा लागला. तुम्ही संतुष्ट कसे असें ते त्वेषानें जनतेला विचारीत. सरकार हें किती जुलमी, निर्दय बनले आहे पहा असे सांगून ते सरकारची व या राज्ययंत्राची नामुष्की करीत, नाचक्की
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
टिळक व ग्लॅडस्टन यांचे लोकच्छंदानुवर्तित्व.