गोखल्यांनी संमति दिली. कां तर 'सरकारने जे उतारे दाखविले तशा प्रकारच्या उताऱ्यांविरुद्ध प्रेसॲक्ट असणे हे माझ्या नैतिक बुद्धीस पटलें; आणि मला या बिलास विरोध करण्याऐवजी संमति द्यावी लागली,' असें गोखले म्हणाले. मेथांचे धोरण निराळं होतं. 'शांतता आणि सुव्यवस्था' राखण्याच्या कामी सरकारी सोंगाला आम्ही मदत करता कामा नये असे त्यांचे म्हणणे असे व गोखले प्रेस ॲक्टला संमति देऊन आल्यानंतर त्यांनी गोखल्यांस हेच सांगितलें. गोखले व मेथा यांनी कौन्सिलमध्ये उत्तम काम केलें. त्यांनी लोकांची तरफदारी केली. मेथा व गोखले यांनी आपल्या तेजस्वी बाण्यानें व वाणीच्या व बुद्धांच्या ओजस्वितेनें हिंदुस्तानांतील सुशिक्षित वर्गामधून, त्याचप्रमाणे कायदेकौन्सिलांतून प्रत्यक्ष अधिकाऱ्यांबरोबर वाग्युद्ध करून, त्यांचे दोष निर्भीडपणे मांडून, निरनिराळे प्रसंग ओळखून, निरनिराळ्या युक्तिवादांनी, कुशलतेनें, त्याचप्रमाणे अत्यंत स्पष्ट व जोमदार वृत्तीनें लोकजागृतीचे कार्य सतत केलें. गोखल्यांच्या राजकारणाला हिंदुस्तानांतच नव्हे तर इंग्लंडांत व दक्षिण आफ्रिकेत सुद्धां महत्त्व आले होते. गांधींच्या तिकडील चळवळीला दुजोरा देण्यासाठी १९११।१२ साली गोखल्यांनी हिंदुस्तानांत मोहीम काढून अवाढव्य फंड जमविला. यावरून ते केवढ्या दर्जाचे व वजनाचे ओजस्वी पुढारी होते हें सर्वांच्या लक्षांत येईल.
देशांतील सुशिक्षित समाजांत जी जागृति रानडे, मेथा, गोखले यांनी केली ती जागृति खेडोपाडी सर्वत्र सामान्य जनांपर्यंत टिळकांनी नेऊन पोचविली "अत्यंत निधड्या छातीचे बिनचूक अस्त्रांनी सदैव सज्ज, जनतेत स्पष्ट व ठळक राजकीय भावनांचा संचार करणारे, प्रचंड शक्तीचे लोकाग्रणी" असें टिळकांचें वर्णन यथायोग्य होईल. राजकारणामध्ये आपल्या पाठीमागे प्रचंड जनसमूह पाहिजे असल्यामुळे सामाजिक बाबतीत मतभेद पाडणारे प्रश्न बाजूस ठेवून ज्यावर सर्व लोकांचे एकमत होईल असे राजकीय जागृतीचे काम त्यांनीं आपल्या शिरावर घेतले. आणि म्हणूनच ते धर्माचे कैवारी गणले गेले. सतरा डगरींवर हात ठेवून कोणतेच काम होत नसतें, हा चिरंतनचा अनुभव आहे. आणि हें राजकीय हक्कांचं काम हाती घेतांना त्यांनी इतर गोष्टींकडे कानाडोळा केला. ते असेच म्हणत असत की राजकारणाच्या बाबतीत सामाजिक प्रश्न मिसळू नका. सर्व राष्ट्राला राजकार-
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१
मेथा व गोखले यांची कामगिरी.