करीत. अर्थात् या गोष्टींमुळे टिळकांवर सरकारचा रोष होई. मवाळांस ते काँग्रेसमध्ये नकोत असे वाटे; कारण आपणांवरील सरकारचा विश्वास उडेल असें त्यांस वाटे. मेथा या मवाळाग्रणीनें एकदां बामणगांवकरप्रभृति वऱ्हाडप्रांतीय मंडळी त्यांस भेटावयास गेली असतां त्यांस टिळकांपासून आपण दूर कां राहत होतों यांतील इंगित सांगितले. 'तुमचें पुढारीपण स्वीकारावयाला टिळकच लायक, मी नाहीं; सुखाला सर्वस्वी दूर लोटून देशसेवा करण्याइतकें तेज आमच्या अंगांत नाहीं हें मी कबूल करतों. असें जरी आहे, तरी देशसेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. टिळकांसारखे लोक धैर्याने व त्यागाने परिस्थिति निर्माण करूं शकतात. तर आम्ही लोक त्या परिस्थितीचा फायदा देशाच्या पदरांत टाकतो. अशा रीतीने टिळकांचें व आमचें परिणामाच्या दृष्टीने सहकार्य सहज घडते. टिळकांनी निर्माण केलेल्या परिस्थितीचा फायदा राष्ट्राच्या पदरांत आम्हांस टाकतां यावा म्हणूनच काँग्रेसही आम्हांस पाहिजे. आम्ही ती टिळकांस देणार नाहीं. काँग्रेस जर आम्हांस नसली तर आमच्या अस्तित्वाला वाव नाहीं व आमच्यासारख्या सुखेच्छु पण देशाभिमानी लोकांचा राष्ट्रालाही फायदा होणार नाहीं." या मेथांच्या उत्तरावर त्यांस विचारण्यांत आले, 'तुम्ही टिळकांस काँग्रेसबाह्य करतां यामुळे सरकारला त्यांस चिरडण्याची संधि मिळते.' यांचे उत्तर देतांना मेथा म्हणाले, 'आम्ही टिळकांना कांग्रेसबाहेर ठेवतों म्हणून सरकार त्यांच्यावर कायद्याचे हत्यार उचलतें ही गोष्ट सर्वस्वी चुकीची आहे असे मी म्हणत नाहीं. पण अशा प्रसंगी आम्ही सरकाराला मदत करता कामा नये. सरकारच्या दडपशाहीचे लोकांवर परिणाम होऊन प्रसंगी लोक तीव्र स्वरूप प्रकट करितात, तें नाहींसें व्हावें म्हणून आम्ही प्रयत्न करूं लागलो, तर त्या प्रयत्नांत आमच्या बरोबर सर्वस्वाचा नाश आहे. राजनिष्ठा व्यक्त करणे, टिळकांजवळून दूर राहणें, त्यांचे व आमचं पटत नाही असें तीव्रतेने सरकारास भासविणें आणि आमचें म्हणणें सरकार मान्य करीत नाहीं म्हणून टिळकांचें विनाशक असे राजकारणाचें धोरण लोकप्रिय होतें असें उठल्याबसल्या सरकारच्या कानीकपाळी ओरडणें येवढेच आमचें धोरण. हे धोरण जर आमच्याकडून शिस्तीने अमलांत आले तर टिळकांना दडपून टाकण्याचें पाप करावयाला सरकारही धजणार
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३
नेमस्त टिळकांशी फटकून कां वागत? - मेथांचा खुलासा.