Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
न्या. रानडे यांची शिकवण - डेक्कन सभेचे ध्येय.

नेमस्तपणा त्यांनी शिकविला. सामाजिक, राजकीय, धार्मिक, कोणतीही बाब असो, त्या त्या बाबतीत लोकांशी आणि सरकारशी तुटकपणे न वागतां, परंतु आपली मतें व ध्येये सुद्धां न सोडतां आस्तेकदम पण चिरस्थायी प्रगति करून घ्यावी असे त्यांच्या शिकवणुकीचे सार आहे. डेक्कन सभा स्थापन करतांना तिचे ध्येय त्यांनी अशाच शब्दांत सांगितले आहे. ते लिहितात :- 'Liberalism and moderation will be the watch-word of this association. The spirit of liberalism implies a freedom from race and creed prejudices and a steady devotion to all, that seeks to do justice between man and mau, giving to the rulers the loyalty that is due to the law they are bound to administer, but securing at the same time to the ruled the equality which is their right under the law. Moderation imposes the condition of never vainly aspiring after the impossible or after too remote ideals, but striving each day to take the next step in the order of natural growth by doing the work that lies the nearest to our hands in a spirit of compromise and fairness." रानड्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणारे गोखले. पण ते मनांतून जहाल होते असेच आम्हांस दिसते. त्यांनी रानड्यांच्याच सनदशीर मार्गाने पुढे पाऊल टाकले. परंतु रानड्यांच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणांत त्यांस राजकीय चळवळ करतां आली. मेथा यांनी कौन्सिलांत लोकपक्षाच्या पुढाऱ्याने काम कोणत्या पद्धतीने करावे हे शिकविले. नमून न वागतां, स्वाभिमानानें व देशहितैक दृष्टीने सरकारच्या बेमुर्वतखोर वर्तनास ताबडतोब जेथल्या तेथे आळा घालण्याचा प्रयत्न करणें आणि सरकारवर टीका करण्यास न भिणें हे गुण लोकप्रतिनिधींच्या अंगांत असले पाहिजेत असे मेथांनी स्वतःच्या आचरणाने दाखविले; याच त्यांच्या प्रकारामुळे त्यांस कौन्सिलमध्ये 'New Spirit' नवीन जोम उत्पन्न करणारा, नवीन वारें भरणारा, असा सरकारी अधिकाऱ्यांकडून किताब मिळाला. गोखल्यांच्या डोळ्यांसमोर ही मेथांची कौन्सिलमधील चळवळ होती. परंतु मेथांचं कौन्सिलमधील सर्व धोरण गोखल्यांच्या फाजील सरळपणामुळे त्यांस साधलें नाहीं. कौन्सिलमध्ये प्रेसॲक्टास