त्यांनी मागेपुढे पाहिले नसतें. परंतु १९२२ साली गांधींस जर बार्डोलीचा कार्यक्रम थांबवावा लागतो तर १९०७ साली गोखल्यांस तें किती अशक्य दिसले असेल? म्हणून ते लोकांस हळूहळू तात्त्विक रीत्या शिकवीत होते. परंतु जनता विकारवश असते. हा हळूहळूपणा तिला आवडत नाहीं. तिला त्याचा कंटाळा येतो. तिला चवताळवून मग चुचकारलें पाहिजे. टिळकांनी प्रथम चवताळविले, परंतु सावरकरांसारख्या अत्यंत देशभक्तीनें प्रेरित झालेल्या रत्नांस आवरण्यासही ते तयार होते, हें त्यांनीं आपल्या मतांच्या केलेल्या खुलाशावरून दिसून येईल. सुशिक्षित लोक आणि अशिक्षित लोक यांस कार्यक्षम आणि देशप्रेमी बनविण्यास निरनिराळे मार्ग लागतात. एकच मार्ग सर्वत्र उपयोगी पडत नाहीं. जो गाढ निजला आहे त्याच्या कानांत पाणी घालावें लागतें; जो गुंगीत आहे त्याला हलवले, हांका मारल्या, की तो जागा होतो. टिळक व गोखले दोघांच्याही बोलण्यांत अर्थ आहे. दोघे परस्परपूरक आहेत. प्रत्येक देशांत, पारतंत्र्याच्या पंकांत पिचत पडलेल्या प्रत्येक राष्ट्रांत अशा प्रकारचे दोन पक्ष नेहमी असतात. आयर्लंड, ईजित, कोरिया, या देशांत असे दोन पक्ष आपणांस दिसून येतात. एक पक्ष सरकारशी शक्य तितकें मिळते घेऊन गोडीगुलाबीनें वागणारा असतो. सरकारकडून हळूहळू सुधारणा घडवून आणण्याचें त्याचे ध्येय असतें. दुसरा पक्ष प्रखर प्रकृतीचा असतो; निःसत्त्व करूं पाहणाऱ्या परकी सरकारचा त्यास संताप येतो. सरकारच्या कृष्ण कृत्यांवर प्रकाश पाडून लोकांस जागृत करून तो सरकारास बजावतो, लोक प्रक्षुब्ध झाले आहेत, त्यांची मनें जर शांत करावयाची असतील तर ताबडतोब त्यांची दुःखे दूर करा. ही दुःखे दूर करण्यासाठी अधिकारी प्रजेच्या हुकमतीखाली पाहिजेत. एकादा अधिकारी वाईट असला तर त्यास हुसकून लावण्याचे सामर्थ्य प्रजेत असले पाहिजे. राजा, राज्य, प्रजेसाठी असतें. तेव्हां सरकारने जर दडपेगिरीचें धोरण चालू ठेवलें तर लोकांनी स्वस्थ बसूं नये; बसतां कामा नये. हा आत्मघातकीपणाचा मार्ग आहे. आत्महत्यारा होणे केव्हांही नाशासच नेणार.
दादाभाईची कामगिरी इंग्लंडमध्ये झाली. रानड्यांनी सुशिक्षितांस हाताशी धरून सर्वांगीण प्रगति व्हावी म्हणून आयुष्य खर्च केलें. सर्वत्र
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९
भिन्न प्रकृतीच्या लोकांस कार्यक्षम करण्याचे भिन्न मार्ग.