Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
आधी चोराला लंबे करा, मग भावाभावांतले तंटे मिटवा.

and memoiralizing for gifts and favours. Gifts and favours are of no value, unless we have deserved the concessions by our own elevations and onr own struggles.' लोकांतील धैर्य, विश्वास, बंधुप्रेम हे सर्व गुण नाहींसे होत चालले असें त्यांस दिसे. तेव्हां प्रथम देशाची नैतिक सुधारणा करूं या असे त्यांचे म्हणणे असे. आपल्यास जर दैववशात् सर्व हक्क आज मिळाले तर ते उपभोगण्यास आपण लायक नाहीं असें त्यांस मनापासून वाटे. तंटे, वैरें, विरोध, मत्सर या दुर्गुणांनी आपणांस सर्व बाजूंनी घेरले आहे. आलस्य अद्याप गेलें नाहीं; काम करण्याची हौस उत्पन्न झाली नाहीं. प्रातिनिधिक संस्थांचे महत्त्व जसे पटावे तसें पटलेले दिसत नाहीं. हे सर्व आपण नाहीस केले पाहिजे. टिळक या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नसत. आधी बाहेरचा दिंडीदरवाजा नीट करूं या मग घरांतल्या भिंतीचा गिलावा वगैरे करण्यास पुष्कळ वेळ आहे; आधीं चोर शिरजोर होणार नाहीं याची व्यवस्था केली, की मग भावाभावांतले तंटे मिटवण्यास पुष्कळ सवड आहे. आपण आपले तंटे मिटवीत असतां या चोराने समयानुसार प्रत्येकाचा 'कैपक्ष' दोघांसही भिकारी करणे व आपण त्याच्या कपटाला बळी पडणे हे फार अयोग्य व लाजिरवाणे आहे. आपण अशक्त असलो तरी चोराला दरडाविले पाहिजे असे टिळकांचे मत होते. गोखले म्हणत, या दरडावण्याचा कांही उपयोग होणार नाहीं. लजपतरायांनी आपल्या एका लेखांत म्हटले आहे- 'If you threaten, you must be in a position to carry out the threat. Else it is worse than useless,' आपल्या पाठीमागे जोर नाहीं याची गोखल्यांस पूर्ण जाणीव होती. उगीच मोठमोठे विचार मांडण्यांत काय अर्थ आहे? सध्या आपण त्यांस विनंत्या करूं. या विनंत्या करीत असतांना देशप्रेमाचा खुराक खाऊन धष्टपुष्ट होऊन मग दरडावले तर त्यांत कांही तरी अर्थ आहे. गोखले सुद्धां मतांनी जहालच होते. नेव्हिन्सन म्हणतो :- 'For himself, I discovered many months afterwards that Mr. Gokhale hated the name of Moderate, as I suppose, all beings of flesh and blood needs must.' परंतु लोकांची तयारी नाहीं म्हणून ते जहाल झाले नाहीत. करबंदी करण्यासारखी चळवळ सुद्धां हाती घेण्यास